घरदेश-विदेशमोदी सरकारच्या 'या' योजनेचा लाभ घेतायंत, Post Office देखील देणार 'ही' सेवा...

मोदी सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ घेतायंत, Post Office देखील देणार ‘ही’ सेवा विनामूल्य

Subscribe

तुमच्या कुटुंबातील कोणाचे पोस्ट ऑफिसमध्ये खातं आहे का? असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. पोस्ट ऑफिसने बचत खात्याच्या काही अटी बदलल्या आहेत. या बदललेल्या अटींमुळे Account maintenance fees पूर्वीपेक्षा कमी करण्यात आली आहे. म्हणजेच खात्यात Minimum Balance पेक्षा कमी रक्कम असल्यास आता निम्मे शुल्क आकारले जाणार आहे. यासह आणखी एक फायदा म्हणजे सरकारी पेन्शन, शिष्यवृत्ती आणि इतर सेवांचा लाभ घेणार्‍या ग्राहकांना zero balance basic savings account उघडण्याची संधी मिळणार आहे.

कम्‍युनिकेशन मिनिस्‍ट्रीच्या आदेशानुसार, एखाद्या प्रौढ व्यक्तीने शासकीय कल्याणकारी योजनेत नोंदणी केली असेल तर तो Basic Saving Account उघडू शकतो. खातेदार अल्पवयीन असल्यास त्याचे Guardian देखील खाते उघडू शकणार आहे. यापूर्वी इंडिया पोस्ट बँकेने Post Office Saving Account मधून महिन्यांतून ४ वेळा पैसे काढल्यानंतर शुल्क आकारण्यात येईल असे सांगितले होते. ही रक्कम २५ रूपये किंवा काढलेल्या रकमेच्या ०.५ टक्के असेल, असेही सांगितले होते.

- Advertisement -

Post Office कडून देण्यात आलेल्या योजनेत निवृत्तीवेतन, वृद्ध पेन्शन, विधवा पेन्शन, शिष्यवृत्ती आणि एलपीजी अनुदान यासारख्या योजनांचा समावेश आहे. अशा योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना zero balance basic savings account उघडता येणार आहे. याशिवाय Post Office current account वर २५ हजार रुपये कोणत्याही शुल्काशिवाय काढता येणार आहे. त्यानंतर २५ रुपये किंवा ०.५ टक्के रक्कम आकारण्यात येणार आहे. डाकघरने बचत खात्यातील Minimum Account Balance ५० रुपयांवरून ५०० रुपयांपर्यंत वाढविला आहे. १९ डिसेंबर २०१९ पर्यंत, १३ कोटी बचत खात्यांमधील Minimum Account Balance ५०० रुपयांपेक्षा कमी होता.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -