Petrol Diesel Price Drop: मोदी सरकारकडून जनतेला दिवाळीचं गिफ्ट! पेट्रोल-डिझेलच्या दरात केली कपात

modi government came to power in 2014 petrol prices increased by 45 percent and diesel by 75 percent
petrol diesel price : मोदी सरकारच्या 8 वर्षांच्या काळात पेट्रोल 45 आणि डिझेल 75 टक्क्यांनी कसे महागले? जाणून घ्या

ऐन दिवाळीत मोदी सरकारने जनतेला मोठा दिलासा देणारे गिफ्ट दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी होतायत, याकडे संपूर्ण जनतेचे लक्ष लागले होते. केंद्र सरकारने आता पेट्रोल-डिझेलच्या दरात कपाती केली आहे. आता पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त झाले असून डिझेलच्या दरात १० रुपयांची कपाती करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होताना पाहिले. तसेच काही दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहिल्याचे पाहिले आहे. पण दिवाळीच्या पूर्वसंध्येवर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केली आहे. उद्या म्हणजेच गुरुवारपासून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे ५ रुपये आणि १० रुपयांनी कमी होणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या उत्पादन शुल्कात दुप्पट कपाती झाली आहे. आगामी रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांपासून जनतेला दिलासा देणारी ही बातमी आहे. पण आता या दिलासादायक बातमीमुळे पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी होण्याची आशाही वाढली आहे.

देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल १०० रुपये प्रति लीटर पार गेले आहे. दररोज पेट्रोल ३५ पैशांनी वाढत आहे. ४ ऑक्टोबर २०२१ पासून २५ ऑक्टोबरपर्यंत पेट्रोलच्या दरात सरासरी आठ रुपयांनी वाढ झाली.

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय होते? 

मुंबई

पेट्रोल – ११५.८५ रुपये प्रति लीटर
डिझेल – १०६.६२ रुपये प्रति लीटर

दिल्ली

पेट्रोल – ११०.०४ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९८.४२ रुपये प्रति लीटर

चेन्नई

पेट्रोल – १०६.६६ रुपये प्रति लीटर
डिझेल – १०२.५९ रुपये प्रति लीटर

बंगळूरू

पेट्रोल – ११३.९३ रुपये प्रति लीटर
डिझेल – १०४.५० रुपये प्रति लीटर

चंदीगड

पेट्रोल – १०५.९४ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९८.१६ रुपये प्रति लीटर