घरटेक-वेकChinese Apps Ban: मोदी सरकारने दिला चीनला झटका! ५४ चीनी ॲप्सवर घातली...

Chinese Apps Ban: मोदी सरकारने दिला चीनला झटका! ५४ चीनी ॲप्सवर घातली बंदी

Subscribe

भारताने पुन्हा एकदा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही चीनी ॲप्सवर बंदी घातल्याचे समोर आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक असणाऱ्या ५४ चीनी ॲप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. माहितीनुसार या बंदी घातलेल्या ॲप्समध्ये Beauty Camera: Sweet Selfie HD, Beauty Camera – Selfie Camera, Equalizer & Bass Booster, CamCard for SalesForce Ent, Isoland 2: Ashes of Time Lite, Viva Video Editor, Tencent Xriver, Onmyoji Chess, Onmyoji Arena, AppLock आणि Dual Space Lite यांसारख्या ॲप्सचा समावेश आहे. मोदी सरकारने सर्वात पहिल्यांदा जून २०२०मध्ये देशातील ॲक्टिव्ह चीनी ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून आतापर्यंत चीनमध्ये तयार झालेले एकूण २२४ ॲप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहेत. (modi government bans 54 Chinese apps that pose threat to national security)

- Advertisement -

जून २०२०मध्ये केंद्र सरकारने ५९ ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. असे पहिल्यांदाच भारतात घडले होते. सरकारने TikTok, UC Browser, Shareit, WeChat सारख्या लोकप्रिय ॲप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर सप्टेंबर २०२०मध्ये ११८ चीनी ॲप्सवर पुन्हा बंदी घातली गेली. मग नोव्हेंबर २०२०मध्ये केंद्र सरकारने ४३ चीनी ॲप्सवर बंदी घातली.

दरम्यान मोबाईल गेम गरेना फ्री फायर (Garena Free Fire) १२ फेब्रुवारीपासून गूगल प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवर दिसत नाही आहे. याचा अर्थ या गेमवरही सरकारने बंदी घातली असेल असा होत आहे. पण सध्या यादीमध्ये ज्या ॲप्सची नावं आहेत, त्यामध्ये या गेमचे नाव दिसत नाहीये. परंतु डाऊनलोडींग प्लेटफॉर्म्सवरून या गेम हटवण्याचे हेच कारण असू शकते का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Twitter Down: शुक्रवारी मध्यरात्री ट्विटर झालं होतं डाऊन, १ तासांनी सुरळीत झाली सेवा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -