घरताज्या घडामोडीमोदी सरकारकडून ६.५ करोड देशवासियांना दिवाळी गिफ्ट, आता PF वर मिळणार ८.५...

मोदी सरकारकडून ६.५ करोड देशवासियांना दिवाळी गिफ्ट, आता PF वर मिळणार ८.५ टक्के व्याज

Subscribe

लवकरचं मंत्रालय याविषयीच्या अधिसूचना जारी करणार

दिवाळीनिमित्त देशातील ६ करोडहून अधिक लोकांसाठी मोदी सरकारने दिवाळी गिफ्ट दिले आहे. अर्थ मंत्रालयाने आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी भविष्य निधी म्हणजेच प्रोव्हिडेंट फंडमध्ये ८.५ टक्के व्याजदर करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे देशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. ईटीचे सचिव सुनील वर्थवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी पीएफवर ८.५ टक्के व्याज देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे आता लवकरचं मंत्रालय याविषयीच्या अधिसूचना जारी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे EPFO कडे जवळपास ३०० करोड सरप्लस वाचणार आहे. याआधी मागील वर्षी म्हणजेच २०१९-२० मध्ये त्यांचे सरप्लस १,००० करोड रुपये होते.

EPFOच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी यांनी याच वर्षी मार्च महिन्यात २०२०-२१ पीएफवर ८.५ टक्के व्याज देण्यासाठी मंजूरी दिली होती.  २०१८-१९ मध्ये हे व्याजदर ८.६५ इतके होते. आर्थिक वर्ष २०१८-१९मध्ये व्याजदर ८.६५ टक्के तर २०१७-१८मध्ये ८.६५ टक्के, २०१५-१६मध्ये ८.८ टक्के व्याज होते. त्याचप्रमाणे आर्थिक वर्ष २०१४-१५ आणि २०१३-१४ मध्ये ८.७५ टक्के व्याज देण्यात आले होते. २०१२-१२मध्ये देखील ८.५ टक्के तर २०११-१२मध्ये ८.२५ टक्के व्याज देण्यात आले होते.

- Advertisement -

पीएफ हा भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा फंड आहे. महामारीच्या काळात अनेक लोकांना त्यांच्या पीएफ खात्याचा फायदा झाला होता. नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी पीएफ अत्यंत महत्त्वाचा असतो. ऐन दिवाळीत मोदी सरकारने पीएफ मिळणाऱ्या व्याजाची टक्केवारी वाढवल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे.


हेही वाचा – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची अशी आहे लाईफस्टाईल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -