Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Pm kisan Yojana: खुशखबर! मोदी सरकार शेतकऱ्यांना वर्षाला देतेय ४२ हजार, जाणून...

Pm kisan Yojana: खुशखबर! मोदी सरकार शेतकऱ्यांना वर्षाला देतेय ४२ हजार, जाणून घ्या कसे?

Related Story

- Advertisement -

तुम्ही जर दर महिन्याला ३ हजार रुपयांचा लाभ घेऊन इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान योजनेचा (Pm kisan yojana) लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना वर्षाला ३६ हजार रुपये दिले जात आहे. जर तुम्ही देखील पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेत असाल तर आता तुम्हाला ४२ हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल. याचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता? ते जाणून घ्या.

माहितीनुसार, पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधान किसान मानधन योजनेचा फायदा मिळतो. ज्यामध्ये लाभार्थ्यांना ३६ हजार रुपये दिले जातात. शिवाय मानधन योजनेसाठी तुम्हाला कोणतेही वेगळे कागदपत्र द्यायची गरज नाही आहे.

कसे मिळतील ४२ हजार रुपये

- Advertisement -

पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi) अंतर्गत दर महिन्याला ३ हजार रुपये दिले जातात म्हणजे वर्षाला ३६ हजार रुपये मिळतात. तर पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना २ हजार रुपये तीन हफ्ते दर वर्षी मिळतात म्हणजे प्रत्येक वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. जर शेतकऱ्याला या दोन्ही योजनेचा लाभ मिळत आहे. तर प्रत्येक वर्षाला ४२ हजार रुपये सरकारकडून दिले जातात.

कोणता शेतकरी याचा फायदा घेऊ शकतो

पंतप्रधान किसान मानधन योजनेचा लाभ १८ ते ४० वर्षांच्या शेतकऱ्यापर्यंत मिळतो. परंतु याच्यासाठी एक अट आहे. शेतकऱ्यांकडे कमीत कमी २ हेक्टर शेतीची जमीन असायला पाहिजे. त्यांना दर महिन्याला ५५ रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंतचा प्रीमियर जमा करावा लागेल.

- Advertisement -

जर १८ वयोगटातील शेतकरी असेल तर महिन्याला ५५ रुपये प्रीमियम जमा करावा लागेल. या व्यतिरिक्त जर तुम्ही ३० वर्षांचे असाल तर वर्षाला ११० रुपये प्रीमियम द्यावा लागेल. तसेच ४० वर्षांचे असाल तर २०० रुपये प्रीमियम द्यावा लागेल. मानधन योजना एक प्रकारची पेंशन योजना आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना दर महिन्याला पेंशन मिळते. शेतकऱ्याला ६० वर्षांनंतर देखील ही पेंशन दिली जाते.


हेही वाचा – IBPS RRB PO/Clerk Recruitment 2021: तब्बल १०४६६ रिक्त पदांसाठी IBPS जारी केले नोटिफेकेशन, जाणून घ्या डिटेल्स


 

- Advertisement -