नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात देशभरातील नागरिकांना इंडिया नाही तर भारत असा शब्दप्रयोग करा असे आवाहन केले होते. संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या या आवाहनानंतर देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी इंडिया एवजी भारत नावालाच पसंती दिली आहे. जी-20 संमेलनासाठी येणाऱ्या विदेशी पाहुण्यांसोबतच देशातील मान्यवरांना दिलेल्या निमंत्रण पत्रिकेत राष्ट्रपतीनी रिपब्लिक ऑफ इंडिया एवजी रिपब्लिक ऑफ भारत अशा शब्दांचा वापर केला आहे. (Modi government implemented Mohan Bhagwat’s insistence, mention in G-20 invitation)
जी-20 शिखर परिषद 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी अनेक देश भारतात येत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-20 मध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीत येणार्या परदेशी राष्ट्राध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण पाठवले आहे. या निमंत्रणपत्रिकेत प्रथमच रिपब्लिक ऑफ इंडिया ऐवजी रिपब्लिक ऑफ भारत हा शब्द वापरण्यात आला आहे. राष्ट्रपतींनी भारत या शब्दाचा वापर करणाऱ्यावर आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या आवाहनाशी जोडला जात आहे.
हेही वाचा : दसरा मेळाव्याला झालेल्या कोट्यवधींच्या खर्चावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, 800 जणांकडून…
काय म्हणाले होते मोहन भागत?
आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी शुक्रवारी गुवाहाटी येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात म्हटले होते की, आपल्या देशाला भारत या नावानेच अनेक वर्षापासून ओळखले जाते. याचवेळी त्यांनी देशाला इंडिया नाही तर भारत या नावाने ओळखले जावे असे आवाहन केले होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या देशाचे नाव भारत आहे, आपण जगात कुठेही गेलो तरी देशाचे नाव सर्वत्र भारतच राहिले पाहिजे, जेव्हा आपण म्हणू, ऐकू आणि लिहू तेव्हाच ते रुजवले जाईल. जरी कोणाला ते समजले नाही, तर त्याची अजिबात काळजी करू नका. समोरच्याला समजून घ्यायचे असेल तर तो स्वतःच समजून घेईल. आज जगाला आपली गरज आहे, आपण जगाशिवाय जगू शकतो पण जग आपल्याशिवाय जगू शकत नाही असेही वक्तव्य त्यांनी केले होते.
हेही वाचा : ICC CRICKET WORLD CUP 2023 : भारतीय संघाची घोषणा; चार खेळाडू खेळणार पहिला विश्वचषक, वाचा कोण?
भागवत म्हणाले, सवया लावा
यावेळी आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना संघ प्रमुख मोहन भागवत यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, भारतात राहणाऱ्या प्रत्येकांने इंडिया एवजी भारत म्हणण्याची सवय लावावी, कारण हे नाव प्राचीन काळापासून चालत आले आहे. हे नाव यापुढेही सुरू राहणे गरजेचे आहे. आता सर्वत्र इंडियाएवजी भारत हा शब्द वापरला जावा. त्यांच्या आवाहनानंतर भारतीय राज्यघटनेतून इंडिया हा शब्द काढून टाकण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.