घर ताज्या घडामोडी 7th Pay Commission: केंद्राकडून कर्मचाऱ्यांना खुशखबर, कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ

7th Pay Commission: केंद्राकडून कर्मचाऱ्यांना खुशखबर, कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ

Subscribe

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. सध्याच्या भत्त्यात वाढ होऊन ही आकडेवाडी ३६८ टक्क्यांवरून ३८१ पर्यंत जाणार आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी पाचवा आणि सहाव्या वेतन आयोगाच्या पूर्व सुधारित वेतनश्रेणी किंवा ग्रेड पेमध्ये या कर्मचाऱ्यांचे वेतन काढणार आहे. रेल्वेसह केंद्रातील अन्य काही खात्यांमध्ये सातवा वेतन आयोगानुसार अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचे वेतन पूर्व-सुधारित वेतनश्रेणी किंवा पाचव्या CPC च्या ग्रेड पेमध्ये काढले जात आहे. केंद्र सरकारच्या इतर कर्मचार्‍यांचे वेतन पूर्व सुधारित सहाव्या CPC वेतनश्रेणी किंवा ग्रेड पेनुसार काढण्यात येणार असल्याची महिती समोर आली आहे. केंद्राने त्यांचा डिअरनेस अलाऊंस १९६ टक्क्यांवरून २०३ टक्के केला आहे.

- Advertisement -

१ जानेवारी २०२२ पासून ही वाढ लागू होईल, अशी माहिती वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाकडून जारी करण्यात आली होती. अखेर हे प्रकरण मार्गी लागलं असून लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत.

केंद्र सरकारने मागील महिन्यातील महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली होती. या संदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या बाबतीत मोदी सरकारनं देखील अधिकृत घोषणा केली. सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना महागाईच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी त्यांच्या पगार/पेन्शनमध्ये हा घटक जोडला गेला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अनेकांना त्याचा फायदा होणार आहे. सध्या देशभरात ५० लाखांपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचाऱ्यांची संख्या आहे. तसेच ६५ लाख माजी केंद्रीय कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत आहे.


- Advertisement -

हेही वाचा : Jahangirpuri Violence : जहांगीरपुरीमधील बुलडोझरला सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक, तोडकाम थांबवण्यावण्यासाठी दिल्ली महापालिकेला आदेश


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -