घरदेश-विदेशमोदी सरकारचं मोठं गिफ्ट; पुढील दीड वर्षांत 10 लाख नोकऱ्या देणार

मोदी सरकारचं मोठं गिफ्ट; पुढील दीड वर्षांत 10 लाख नोकऱ्या देणार

Subscribe

गेल्या वर्षी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते की, 1 मार्च 2020 पर्यंत केंद्र सरकारच्या विभागांमध्ये 8.72 लाख पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत हे स्पष्ट आहे की, सध्या हा आकडा 10 लाखांच्या जवळ गेला असेल, ज्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भरतीचे आदेश दिले आहेत.

रोजगाराच्या मुद्द्यावरून अनेकदा प्रश्नांना सामोरे जाणाऱ्या मोदी सरकार एक मोठं पाऊल उचलंल आहे. याबाबतची माहिती खुद्द पंतप्रधान मोदींनी दिली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विट करून सांगितले की, पुढील दीड वर्षात मोदी सरकार 10 लाख पदांची नोकर भरती करणार आहे. पीएमओ इंडिया अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती देत ट्विट करण्यात आले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्रालये आणि विभागांमधील मानव संसाधनांचा आढावा घेतला आहे. यासोबतच येत्या दीड वर्षात मिशन मोडवर काम करून 10 लाख लोकांची भरती करावी, असे आदेशही त्यांनी सरकारला दिले आहेत. (modi government says recruit 10 lakh employees in central government departments)

- Advertisement -

केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी पीएमओच्या वतीने नोकरीच्या घोषणेवर ट्विट करत लिहिले की, हे आत्मनिर्भर भारत बनण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.

त्यामुळे रोजगार शोधणाऱ्या तरुणांसाठी मोदी सरकारसाठी ही आनंदाची बाब आहे. पाटणा, अलाहाबाद सारख्या शहरांमध्ये तरुणांनी रेल्वे भरतीसाठी निदर्शने झाली. मोदी सरकारवरही अनेकदा रोजगाराचे आश्वासन देऊनही रोजगार भरती न केल्याने टीका झाली. विशेषत: नोटाबंदी, जीएसटी आणि नंतर कोरोना या काळात अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावल्यामुळे खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांच्या संधी फारशा बाहेर आल्या नाहीत. अशा परिस्थितीत मोदी सरकारची ही घोषणा सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे.

- Advertisement -

2020 मध्येच जवळपास 9 लाख पदे रिक्त

गेल्या वर्षी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते की, 1 मार्च 2020 पर्यंत केंद्र सरकारच्या विभागांमध्ये 8.72 लाख पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत हे स्पष्ट आहे की, सध्या हा आकडा 10 लाखांच्या जवळ गेला असेल, ज्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भरतीचे आदेश दिले आहेत. जितेंद्र सिंह यांनी सांगितले होते की, केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये एकूण 40 लाख 4 हजार पदे आहेत, त्यापैकी सुमारे 31 लाख 32 हजार कर्मचारी नियुक्त आहेत. अशा प्रकारे 8.72 लाख पदांची भरती करण्याची गरज आहे. इतकेच नाही तर 2016- 17 ते 2020 -21 या कालावधीतील भरतीची आकडेवारी देताना जितेंद्र सिंह यांनी एसएससीमध्ये एकूण 2,14,601 कर्मचाऱ्यांची भरती झाल्याचे सांगितले होते. याशिवाय RRB ने 2,04,945 लोकांना नियुक्ती दिली आहे. तर UPSC ने देखील 25,267 उमेदवारांची निवड केली आहे.


ट्विटमध्ये कोणाचेही नाव नाही, मग विद्यार्थ्याला अटक का? उच्च न्यायालयाने मविआ सरकारला फटकारले

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -