मोदी सरकारचे अमेरिकेला बोचऱ्या शब्दात प्रत्युत्तर, वर्णद्वेष, हल्ले अन् गन कल्चरवरुन बायडेन सरकारला फटकारले

अमेरिकेमध्ये भारताच्या घटनांवर वक्तव्य करुन व्होटबँकेचे राजकारण करण्यात येत आहे. ही एक दुर्दैवी बाब आहे. भारतामध्ये धार्मिक स्वातंत्र आणि मानवधिकारांना महत्त्व दिलं जातं. अमेरिकेसोबतच्या चर्चेमध्ये आम्ही तेथील वांशिक आणि धार्मिक हेतून प्रेरित हल्ले तसेच गनकल्चर असे मुद्द्यांवरुन भारताने फटकारले आहे.

Modi government's attacks on Biden government over gun culture
मोदी सरकारचे अमेरिकेला बोचऱ्या शब्दात प्रत्युत्तर, वर्णद्वेष, हल्ले अन् गन कल्चरवरुन बायडेन सरकारला फटकारले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अमेरिकेला बोचऱ्या शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. अमेरिकेने मोदी सरकारमध्ये अल्पसंख्यांकावर झालेल्या हल्ल्यांवरुन आणि देशातील परिस्थितीवरुन एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला होता. अमेरिकेच्या अहवालात भारतात २०२१ मध्ये अल्पसंख्यांकांवर झालेल्या हल्ल्याबाबत लिहिण्यात आले आहेत. यावरुन मोदी सरकारने पलटवार करताना अमेरिकेतील वर्णद्वेषी हल्ले व गोळीबाराच्या घटनांचा आरसा दाखवला आहे.

मोदी सरकारने अमेरिकेच्या अहवालावर ताशेरे ओढले आहेत. अमेरिकेने भारतातील पक्षपातीपणा आणि प्रेरक हेतूंवर आधारित मते तयार करणे टाळावे असे आम्ही आवाहन करत असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. भारताच्या घटनांवर मत नोंदवून अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत चुकीच्या- तुटपुंज्या व बिनबुडाच्या माहितीवर आधारित हा अहवाल आहे. विविधतापूर्ण समाज असलेल्या जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशाबद्दल अशी कागदपत्रे प्रकाशित करताना पक्षपाती मते मांडणे टाळणे अपेक्षित असते असे परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला प्रत्युत्तरात म्हटलं आहे.

अमेरिकेमध्ये भारताच्या घटनांवर वक्तव्य करुन व्होटबँकेचे राजकारण करण्यात येत आहे. ही एक दुर्दैवी बाब आहे. भारतामध्ये धार्मिक स्वातंत्र आणि मानवधिकारांना महत्त्व दिलं जातं. अमेरिकेसोबतच्या चर्चेमध्ये आम्ही तेथील वांशिक आणि धार्मिक हेतून प्रेरित हल्ले तसेच गनकल्चर असे मुद्द्यांवरुन भारताने फटकारले आहे.

अमेरिकेच्या अहवालात काय म्हटलंय?

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी आयआरएफचा २०२१ चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारतातील धार्मिक स्वातंत्र्य स्थिती आणि उल्लंघनाबाबत विचार मांडले आहेत. तसेच धार्मिक अल्पसंख्याकांच्याविरोधात होत असलेला हिंसाचारावर मत मांडण्यात आले आहे. या अहवाला,त हिंदूंवरील हल्ले, हिंदूंविरोधात गोरक्षकांचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. अल्पसंख्यांकांना घाबरवणं आणि धमकावण अशा अनेक प्रकरणांवर भाष्य करण्यात आले आहे.

हेही वाचा : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आता अडीच तासात पार करता येणार मुंबई-पुणे अंतर