घरअर्थजगत'मिडल क्लास'साठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, 'या' योजनेतून पाच लाखांचा लाभ

‘मिडल क्लास’साठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, ‘या’ योजनेतून पाच लाखांचा लाभ

Subscribe

PM Ayushman Bharat Scheme 2.0 | या योजनेअंतर्गत देशातील ५० कोटी जनतेला मोफत उपचार मिळत आहेत. म्हणजेच, ५० कोटी लोकांना ५ लाखांचं आरोग्य विमा कवरेज देण्यात येत आहे.

नवी दिल्ली – देशात लवकरच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्याआधी मोदी सरकारने मध्यमवर्गीय लोकांसाठी (Middle Class) महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे ठरवले आहे. आयुष्यमान भारत योजनेत (PM Ayushman Bharat Scheme) आतापर्यंत गरिब रेषेखाली नागरिकांना सुविधा मिळत होती. आता या योजनेत मध्यम वर्गीयांनाही समाविष्ट करून घेण्याच्या केंद्राकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीयांचं आरोग्यमानही आता उंचावणार आहे.

हेही वाचा – लवकरात लवकर उरका बॅंकेतील कामे, एप्रिल महिन्यात 15 दिवस बॅंका राहणार बंद; वाचा यादी

- Advertisement -

आयुष्यमान भारत योजनेत मध्यमवर्गीयांना समाविष्ट करून घेण्याकरता आयुष्यमान भारत योजना २.० वर्जन (PM Ayushman Bharat Scheme 2.0) तयार करण्यात येत आहे. या योजनेमुळे भारतातील ४० कोटी नागरिकांना फायदा होणार आहे. आयुष्मान भारत योजनेच्या धर्तीवर नवीन योजना राबविण्यासाठी लागणारा खर्च आणि आव्हाने लक्षात घेऊन सध्या विविध पर्यायांची तपासणी केली जात आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदी सरकारने मध्यमवर्गीयांना कर दिलासा दिला होता. आता ही योजनाही लागू झाल्यानंतर मिडल क्लास लोकांसाठी सरकारचं हे मोठं गिफ्ट ठरू शकणार आहे.

आरोग्य विमा कंपन्यांसोबत चर्चा सुरू

- Advertisement -

आयुष्यमान भारत २.० योजनेअंतर्गत मध्यम वर्गीयांना ५ लाखांपर्यंतचं कवरेज देण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसंच, वैयक्तिक पातळीवर टॉप-अपच्या आधारेही ही योजना आणली जाऊ शकते. या योजनेत आरोग्य विमा कंपन्यांना समाविष्ट करून घेतले जाऊ शकते. ज्यामुळे मध्यमवर्गीयांना अल्पदरात बेसिक मेडिकल कवरेज मिळू शकेल.

हेही वाचा – कारागिर आणि व्यावसायिकांना मिळणार सुलभ कर्ज, मोदींनी आणली नवी योजना

गरीब रेषेखालील लोकांना आरोग्य विमा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांचं आरोग्य सुधारावं, त्यांना उपचारांसाठी सवलत मिळावी याकरता आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात केली होती. पंतप्रधान आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत देशातील १० कोटी कुटुंबांना या योजनेचा फायदा देण्याचे उद्दीष्ट्य होते. या योजनेअंतर्गत देशातील ५० कोटी जनतेला मोफत उपचार मिळत आहेत. म्हणजेच, ५० कोटी लोकांना ५ लाखांचं आरोग्य विमा कवरेज देण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -