घरताज्या घडामोडीCabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा ७ जुलैला विस्तार...नारायण राणे, हिना गावित यांची वर्णी...

Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा ७ जुलैला विस्तार…नारायण राणे, हिना गावित यांची वर्णी लागणार?

Subscribe

पंतप्रधान मोदींना त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करावा लागणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या बुधवार, ७ जुलैला होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून भाजप नेते नारायण राणे आणि खासदार हिना गावित यांची वर्णी लागू शकेल, अशी चर्चा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१९ मध्ये दुसऱ्यांदा सत्तेत आले. त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. परंतु, ७ जुलैला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातील १७ ते २२ मंत्री ७ जुलैला शपथ घेऊ शकतील.

अमित शाह, जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा

पंतप्रधान मोदींना त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करावा लागणार आहे. एका आठवड्यापूर्वी पंतप्रधानांच्या निवासस्थानी एकामागून एक बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये पंतप्रधानांनी मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेतला आहे. त्यानंतरही पंतप्रधानांनी गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह बऱ्याच वरिष्ठ मंत्र्यांशी आणि भाजप नेत्यांशी चर्चा केल्याचे समजते.

- Advertisement -

नवीन चेहर्‍यांचा समावेश?

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपमधील नेत्यांसह एनडीएच्या मित्र पक्षांनाही स्थान मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहर्‍यांचा समावेश असू शकतो. महाराष्ट्रातून नारायण राणे आणि हिना गावित यांना, तसेच आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकेल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -