घरताज्या घडामोडीकोरोना लसीसाठी मोदी सरकारची ५० हजार कोटी रुपयांची तरतूद

कोरोना लसीसाठी मोदी सरकारची ५० हजार कोटी रुपयांची तरतूद

Subscribe

सध्या देश कोरोना विषाणूशी लढत आहे. देशात आतापर्यंत ७७ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यापैकी १ लाख १७ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या कोरोनाच्या लसीकडे सगळ्याचे लक्ष लागले आहेत. तसेच अशा परिस्थितीत लसीवर किती खर्च होईल आणि सरकारची यासाठी काय तयारी आहे? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत आलेल्या माहितीनुसार, ‘चीननंतर सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतातील मोदी सरकारने ५० हजार कोटी रुपये वेगळे ठेवले असल्याचे समोर आले आहे.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रशासनाच्या अंदाजानुसार, देशातील १३० कोटी लोकसंख्येतील प्रत्येक व्यक्तीवर ६ ते ७ डॉलर म्हणजे ४२० रुपयांपासून ४९० रुपयांपर्यंत खर्च येईल. ३१ मार्चला संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत पैसा जमा करण्यात आला आहे. यामुळे लसीकरणासाठी पुढे कुठल्याही प्रकारची आर्थिक कमतरता भासणार नाही, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

सरकारी पॅनेलच्या म्हणण्यानुसार, भारतात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव शिखरावर पोहोचला आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यापर्यंत कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. या कोरोना विषाणूमुळे देशातील आर्थिक विकासाला मोठा धक्का दिला आहे. आता पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत देशात विविण सण-उत्सव असणार आहेत. यादरम्यान कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा वेगाने वाढू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.


हेही वाचा – रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ७८ दिवसांच्या पगाराएवढा मिळणार बोनस

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -