MOTN survey: CM उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियतेत घट, PM पदासाठी नरेंद्र मोदीनांच पसंती

PM Modi security breach cm uddhav thackeray demand investigation in pm modi security threat

इंडिया टुडे Cvoter मुड ऑफ द नेशन (MOTN) सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली आहे. देशातील प्रत्येक राज्यातील सर्वेक्षणातील सहभागी व्यक्तींना मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत मूल्यांकन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या सर्वेक्षणात मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वाधिक अशी पसंती मिळाली आहे, ती म्हणजे ओरिसाच्या नवीन पटनाईक यांना. जवळपास ७१.१ टक्के इतक्या लोकांनी नवीन पटनाईकांच्या कामगिरीला अव्वल ठरविले आहे. तर ममता दीदींना जवळपास ६९.९ टक्के लोकांनी दुसऱ्या क्रमांकावर पसंती दिली आहे. तर तामिळनाडूच्या स्टॅलिन यांना ६७.५ टक्के इतकी पसंती मिळाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पसंतीत घट झाल्याचे पहायला मिळाले आहे. उद्धव ठाकरेंना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांना ६१.८ टक्के इतकी पसंती मिळाली आहे. तर केरळच्या पिनरयी विजयन यांना ६१.१ टक्के इतकी पसंती मिळाली.

मुख्यमंत्र्यांमध्ये सहाव्या स्थानावर अरविंद केजरीवाल (५७.९ टक्के), सातव्या स्थानी हिमंता सरमा (५६.६), आठव्या स्थानी भुपेश बघेल(५१.४), नवव्या स्थानी अशोक गेहलोत (४४.९) यांना पसंती मिळाली आहे. या सर्वेक्षणात भाजपच्या अवघ्या एकच मुख्यमंत्र्यांना टॉप १० मुख्यमंत्र्यांमध्ये पसंती मिळाली आहे. ज्या मुख्यमंत्र्यांचे रेटिंग ५० टक्क्यांहून अधिक आहे, अशा मुख्यमंत्र्यांचेच रेटिंग ठरविण्यात आले होते. भाजपची सत्ता असलेल्या आसाम, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यापैकी फक्त आसामच्या मुख्यमंत्र्यांना ४० टक्क्यांहून अधिक रेटिंग मिळाले आहे. भाजप किंवा भाजपशी युती केलेल्या सरकारमध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांपैकी हरियाणा, कर्नाटक, पुद्दुचेरी आणि गोवा याठिकाणच्या मुख्यमंत्र्यांचे रेटिंग २७ टक्के ३५ टक्के यादरम्यान राहिले.

आगामी दिवसांमध्ये देशातील पाच राज्यांमध्ये विधनासभा निवडणुका पार पडणार आहेत. अशावेळी पंतप्रधानांच्या लोकप्रियतेचे रेटिंगही यावेळी जाहीर करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता उत्तर प्रदेशात ७५ टक्के, गोव्यात ६७ टक्के, मणिपूरमध्ये ७३ टक्के, उत्तराखंडमध्ये ५९ टक्के आणि पंजाबमध्ये ३७ टक्के असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

देशात मोदींनाच पंतप्रधान पदावर पसंती

कोरोनाच्या दोन लाटांचे संकट, आर्थिक चढउतार, भारत चीन सीमासंघर्ष, नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन अशा अनेक मुद्द्यांच्या आव्हानंतरही देशात पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांनाच पसंती आहे. इंडिया टुडे सीव्होटर मुड ऑफ द नेशन सर्वेक्षणात ५८ टक्के लोकांनी मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. तर पंतप्रधानांच्या कामगिरीला ६३ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार पंतप्रधान मोदींच्या जवळपासही इतर कोणत्याही व्यक्तीला पसंती मिळाली नाही. पंतप्रधानानंतर ४६ टक्के इतकी पसंती राहुल गांधींना मिळाली आहे.