घरताज्या घडामोडीपंतप्रधान मोदींसह अमित शहा, सोनिया गांधी आणि प्रियांका चोप्राची बिहारमध्ये झाली RT-PCR...

पंतप्रधान मोदींसह अमित शहा, सोनिया गांधी आणि प्रियांका चोप्राची बिहारमध्ये झाली RT-PCR चाचणी!

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, सोनिया गांधी, प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमार हे दक्षिण बिहारमधील एका जिल्ह्याचे रहिवाशी आहेत, ज्यांनी कोरोना चाचणी तिथे केली आहे आणि त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस देखील तिथेच घेतली आहे, असे समोर आले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या मते हे सर्वजण अरवल जिल्ह्याच्या करपी पंचायतीचे रहिवाशी आहेत, ज्यांची कोरोना चाचणी आणि लसीकरण झाले आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे? वाचा

बिहारच्या अरवलचे जिल्हाधिकारी जे. प्रियदर्शिनी म्हणाले की, २० दिवसांपूर्वी जेव्हा सिव्हिल सर्जन रेकॉर्डचा तपास करत होते, तेव्हा ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. संबंधित डेटा ऑपरेटर्सना बडतर्फ करण्यात आले असून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान इतर जिल्ह्यातील भागांमधील रेकॉर्ड बारकाईने तपास करण्याचे आदेश जारी केले आहे.

- Advertisement -

तसेच अशाच प्रकारची विसंगती पुन्हा समोर आली तर कारवाई केली जाऊ शकते. शिवाय ही चूक कोरोना महामारी विरोधातील मोहिमेचा तमाशा करेल. अजब-गजब रेकॉर्ड बनवण्यात बिहार नेहमीच चर्चेत असतो. याचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण १९९० च्या चारा घोटाळ्यात स्कूटरवरून गुरे घेऊन जातानाचे होते.

- Advertisement -

अलीकडेच अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री सनी लिओनी यांची नावे कॉलेजच्या विद्यार्थी आणि नोकरीसाठी उमेदवार म्हणून चर्चेत आली होती. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी ताजे उदाहरण म्हणजे मोदी, शहा, गांधी आणि प्रियांका चोप्रा यांनी लसीकरण झाल्याचे दाखवून दिले होते.

बिहारमधील व्हायरल होणाऱ्या यादीचा स्क्रीनशॉट शेअर करताना आरजेटी नेत्याने खिल्ली उडवली आणि म्हणाले की, ‘देशात सर्वात जास्त बिहारचा आरोग्य विभाग भ्रष्टाचार, हेराफेरी, उपकरणांची चोरी, तपासात हेराफेरी आणि डेटाची बनावटगिरी यासाठी कुप्रसिद्ध आहे. आता नितीश सरकारने लसीकरणाचे आकडे वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, सोनिया गांधी आणि प्रियांका चोप्राला ट्रिपल डोस लस दिली आहे.’


राज्यात कोरोनाविरोधी लसीकरणाचा १२ कोटींचा यशस्वी टप्पा पार

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -