मोदींना तुरुंगात टाका – राहुल गांधी

राफेल भ्रष्टाचार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुरुंगात टाका असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.

Modi should be in prison- rahul gandhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्ट व्यक्ती असून, त्यांना तुरुंगात डांबले पाहिजे, असे वक्तव्य करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल भ्रष्टाचार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज पुन्हा एकदा राहुल गांधीने आरोप केला आहे. राफेल प्रकरणी नवनव्या गोष्टी उघड करत पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांनी आज या प्रकरणाशी संबंधित एका ई – मेलबाबत माहिती देत पंतप्रधानांवर हे आरोप केले आहे. तसेच पंतप्रधान अंबानी यांचे ‘मिडलमॅन’ म्हणून काम करत होते, असा घणाघात राहुल यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

काय आहे या ई – मेलच्या प्रतमध्ये

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत एका एअरबस कंपनीच्या अधिकाऱ्याने लिहिलेल्या ई – मेलची प्रत सादर केली. या प्रतमध्ये रिलायन्स कम्युनिकेशनचे अध्यक्ष अनील अंबानी हे फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांना भेटल्याचा उल्लेख करण्यात आला असल्याचे राहुल म्हणाले आहेत. या भेटीनंतर राफेल करारानुसार हे कंत्राट आपल्याला मिळेल, असे अनील अंबानी यांनी हा करार होण्याच्या १० दिवस अगोदरच म्हटल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले आहे.

पंतप्रधानांनी गोपनीयतेचा भंग केला

राफेल खरेदी करार होण्याच्या अगोदरच हे कंत्राट आपल्यालाच मिळेल हे अनील अंबानींना आधीच कसे समजले? तसेच या कराराआधीच अनील अंबानी फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांना कसे भेटले? याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे, असे आवाहनही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. तसेच देशाच्या संरक्षण मंत्र्यांना मात्र अजिबात माहित नसते, याबाबत राहुल गांधीने आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोपनीयतेचा भंग केल्याचे महणत पंतप्रधान राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


वाचा – राहुल गांधींवरही बनतोय सिनेमा

वाचा – जेव्हा राहुल गांधी हे मोदींच्या भाषणाची नक्कल करतात