घरदेश-विदेशकर्तव्यतत्पर पंतप्रधान मोदींकडून पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील

कर्तव्यतत्पर पंतप्रधान मोदींकडून पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील

Subscribe

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. गांधीनगर येथे हीराबेन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्तव्यतत्पर पंतप्रधान मोदी यांनी त्यानंतर लगेचच आपल्या नियोजित कार्यक्रमांना सुरुवात केली. पंतप्रधानांनी शुक्रवारी पश्चिम बंगालला 7800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची भेट दिली. त्यांनी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

पंतप्रधान मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांची प्रकृती खालावल्याने 28 डिसेंबर रोजी अहमदाबाद येथील यू. एन. मेहता रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र, उपचारांदरम्यान शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. तसेच, त्यांनीच मुखाग्नी देत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

- Advertisement -

वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिताना मार्गदर्शन केले. आज मला बंगालच्या पवित्र भूमीसमोर नतमस्तक होण्याची संधी मिळाली आहे. बंगालच्या प्रत्येक कणात स्वातंत्र्याचा इतिहास जडलेला आहे. ज्या भूमीवरून ‘वंदे मातरम्’चा जयघोष झाला, तिथून ‘वंदे भारत’ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

- Advertisement -

आज 30 डिसेंबर असून या तारखेलाही इतिहासात वेगळे महत्त्व आहे. 30 डिसेंबर 1943 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानमध्ये तिरंगा फडकवून भारताच्या स्वातंत्र्याचे बिगूल फुंकले होते. 2018मध्ये या घटनेला 75 वर्षे झाली आणि त्यानिमित्त मी अंदमानला गेलो होतो. एका बेटाला नेताजींचे नाव दिले होते, असे मोदी म्हणाले.

आज मला तुम्हा सर्वांना प्रत्यक्षात भेटायचे होते, पण वैयक्तिक कारणांमुळे मी येऊ शकलो नाही. याबद्दल मी माफी मागतो. देशाच्या स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’मध्ये 475 ‘वंदे भारत ट्रेन’ सुरू करण्याचा संकल्प केला होता. आज यापैकी, हावडा ते न्यू जलपायगुडीला जोडणारी एक ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस सुरू झाली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. ही वंदे भारत ट्रेन येत्या 1 जानेवारीपासून बंगालमधील हावडा ते न्यू जलपाईगुडी या मार्गावर धावणार असून हा प्रवास अंदाजे साडेसात तासांत पूर्ण करेल. या वंदे भारत सुपरफास्ट ट्रेनमध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा असतील.

ममता बॅनर्जींकडून आवाहन
कार्यक्रमात सहभागी झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांच्या आई हीराबेन मोदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. माझ्या संवेदना तुमच्यासोबत आहेत. अशा कठीण प्रसंगी आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. आईपेक्षा महत्त्वाचे काहीही असू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना कार्यक्रमाचा कालावधी कमी ठेवण्याचे आवाहन केले. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप दुःखाचा दिवस आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती तुम्हाला देवो, अशी मी देवाकडे प्रार्थना करेन. तुम्ही तुमच्या आईचे अंत्यसंस्कार करून आला आहात, म्हणून या कार्यक्रमाचा कालावधी छोटा ठेवावा ही विनंती, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -