घरदेश-विदेशमोदींच्या भाषणांची एक्सपायरी डेट संपली- प्रियंका गांधी

मोदींच्या भाषणांची एक्सपायरी डेट संपली- प्रियंका गांधी

Subscribe

तीन दिवसीय गंगा यात्रेवर असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधींनी दुसऱ्या दिवशी योगी सरकारने सादर केलेला अहवाल आणि प्रत्यक्षात असलेल्या परिस्थितीत मोठा फरक असल्याचे सांगत भाजप आणि मोदी सरकारवर हल्ला बोल केला.

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून कॉंग्रेसच्या प्रचारात प्रियांका गांधींनी चांगलीच कंबर कसली आहे. तीन दिवसीय गंगा यात्रेवर असलेल्या प्रियांका गांधींनी दुसऱ्या दिवशी राज्यातल्या आणि केंद्रातल्या भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. मागील ७० वर्षात कॉंग्रेसने काय केले असा प्रश्न आपल्या भाषणातुन सतत विचारणाऱ्या भाजपला आता त्यांनी पाच वर्षात काय केले असा प्रश्न विचारला आहे. तर उत्तर प्रदेशातील योगी सरकारने मागील दोन वर्षातील केलेल्या कांमांचा अहवाल सादर केला आहे. मात्र त्यांनी सादर केलेला अहवाल, आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यात फरक असल्याचे म्हणत प्रियांका गांधींनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

योगी सरकारवर टीका

योगी सरकारवर टीका करताना मागील दोन वर्षात त्यांनी उत्तर प्रदेशला काय दिले असे प्रियांका म्हणल्या. त्याचबरोबर कागदावर सादर केलेल्या प्रचारा साठीच्या गोष्टी आणि सामान्य पातळीवर त्यांनी केलेली कामे यात मोठी तफावत आहे. मी रोज लोकांना भेटत असून शेतकरी वर्ग, राज्यातील तरुण वर्ग, विद्यार्थी असूद्या किंवा मग अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्करस कोणालाही योगी सरकारकडून मागील दोन वर्षीत काहीही भेटले नसून प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर असल्याच त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

- Advertisement -

केंद्रातील सरकार दुबळे

दरम्यान, केंद्रातील भाजपचे सरकार हे दुबळे आहे. मोठ-मोठ्या घोषणा करणारे मोदी सरकार हे दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. ५६ इंचाची छाती असलेल्या पंतप्रधानांनी देशाला रोजगार का दिला नाही? आपल्या प्रत्येक भाषणातून ७० वर्षात काँग्रेसने काय केले अशी टीका करणाऱ्या मोदींनी पाच वर्षात काय केले असा सवाल त्यांनी केला. मोदींच्या भाषणांना आता एक्सपायरी डेट आली असून लोकांच्या अपेक्षा पूर्ण न करणारे हे सरकार दुबळे असल्याच त्या म्हणाल्या. दरम्यान प्रयागराज येथे बोटीतून त्यांनी काल प्रचाराला सुरावात केली. दरम्यान, मंगळवार दुसऱ्या दिवशी त्यांनी मिरजापुर विंद्यावसीनी देवीच दर्शन घेतल. तसेच त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना भेट दिली.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -