Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशModi's visit to USA : अपमानाची माती खाऊन पंतप्रधान परतले, ठाकरेंचा घणाघात

Modi’s visit to USA : अपमानाची माती खाऊन पंतप्रधान परतले, ठाकरेंचा घणाघात

Subscribe

अफगाणिस्तानच्या भूमीवर अमेरिकेची लष्करी विमाने कालपर्यंत उतरत होती. आता भारताच्या भूमीवरही ती बेड्या घातलेल्या भारतीयांना घेऊन उतरत आहेत. कोठे गेला तुमचा स्वाभिमान आणि भारताचे सार्वभौमत्व वगैरे.

(Modi’s visit to USA) मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेला गेले आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटून आले. त्यामुळे मोदी यांचे भक्त खूष आहेत. मोदी मायदेशी परतले तेव्हा विमानातून उतरताना त्यांच्या चेहर्‍यावर उत्साह नव्हता तर, एक प्रकारची निराशा होती. नेहमीप्रमाणे अमेरिका जिंकून आलो आणि प्रे. ट्रम्पला खिशात घेऊन आलो हा फाजील आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर यावेळी अजिबात दिसत नव्हता. अमेरिका भेटीत मोदी यांना व्यक्तिश: आणि भारताला काहीच मिळाले नाही. उलट अपमानाची माती खाऊन पंतप्रधान परतले, अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (Thackeray criticizes the PM)

ट्रम्प प्रशासनाने अवैध भारतीयांना बेड्या घालून साखळदंडाने जखडून भारतात पाठवले. यावर मोदी अमेरिकेत जाऊन प्रे. ट्रम्प यांना जाब विचारतील असे वाटले होते, पण मोदी यांनी भारताच्या अपमानावर ‘व्हाइट हाऊस’मध्ये शब्दही उच्चारला नाही. मोदी भारतात परतताच अमेरिकेने भारतीयांनी भरलेले दुसरे लष्करी विमान पाठवले. त्या 116 भारतीयांनाही साखळदंडाने बांधून ठेवले. जे शीख होते त्यांची पगडी जबरदस्तीने उतरविण्यात आली. हे सर्व काँग्रेसच्या राजवटीत घडले असते तर भाजपाने देशभर आंदोलन करून पंतप्रधानांचा राजीनामाच मागितला असता, संसद बंद पाडली असती, पण भाजपाचे पंतप्रधान मोदी ‘व्हाइट हाऊस’मधून अपमानाचे कडू घोट पचवून आले. त्यावर कोणाचाही राष्ट्रवाद जागा झाला नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

हेही वाचा – Supriys Sule : देशमुख आणि मुंडे कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, सुप्रिया सुळे आक्रमक

अफगाणिस्तानच्या भूमीवर अमेरिकेची लष्करी विमाने कालपर्यंत उतरत होती. आता भारताच्या भूमीवरही ती बेड्या घातलेल्या भारतीयांना घेऊन उतरत आहेत. कोठे गेला तुमचा स्वाभिमान आणि भारताचे सार्वभौमत्व वगैरे. येथे राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाच्या नावाने डरकाळ्या फोडायच्या आणि प्रे. ट्रम्प हिंदूंना बेड्या घालून भारतात पाठवतात त्यावर ‘ब्र’ काढायचा नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी अमेरिकेत जाऊन काय मिळवले? हा प्रश्नच असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे. (Modi’s visit to USA: Thackeray criticizes the PM)

हेही वाचा – Eknath Shinde : कामगारांच्या थकीत देणीला पहिले प्राधान्य द्या, उपमुख्यमंत्री शिंदेंचे आदेश