मुंबई : भारतीय संघाचा स्टार गोलंदाज आणि विश्वचषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद शामी (mohammed shami) याच्या पायावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. दुखापतीमुळे तो विश्वचषकापासून (World Cup 2023) भारतीय संघाबाहेर होता. विश्वचषकादरम्यान दुखापत झाली असतानाही शामीने आपल्या गोलंदाजीने विश्वचषक गाजवला. पण त्यानंतर त्याची दुखापत जास्तच बळावली. त्यामुळे अखेर सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून शामीनं एक्सवर पोस्ट शेअर करत सर्जरी यशस्वी झाल्याची माहिती दिली.
Just had a successful heel operation on my achilles tendon! 👟 Recovery is going to take some time, but looking forward to getting back on my feet. #AchillesRecovery #HeelSurgery #RoadToRecovery pic.twitter.com/LYpzCNyKjS
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) February 26, 2024
सावरण्यासाठी वेळ लागेल
मोहम्मद शामीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. कॅप्शनमध्ये शामीनं म्हटलेय की,” आताच माझ्या घोट्याचं यशस्वी ऑपरेशन झालं. सध्या सगळं ठीक आहे. पण मला सावरण्यासाठी वेळ लागेल.” शामीच्या पायाला दुखापत झाल्याने तो चार महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. आता ऑपरेशन झाल्याने तो आयपीएल 2024 ला मुकणार आहे. शामीच्या दुखापतीचा फटका गुजरात संघालाही बसणार आहे. त्याशिवाय टी 20 विश्वचषकालाही मुकण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – Manoj Jarange : मी दिलगिरी व्यक्त करतो; एसआयटी चौकशी लागू होताच जरांगेंना उपरती!
पंतप्रधान मोदींनी केली शामीची विचारपूस; आपुलकीने भारावला गोलंदाज
सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, राजकीय नेते, उद्योजकांबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी जागरुक असतात. नुकतेच त्यांनी टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीच्या प्रकृतीबद्दल विचारपूस करुन काळजी घेणारे ट्विट केले. मोदींच्या या ट्विटने शमी चांगलाच भारावून केला असून त्याने मोदींचे आभार मानले आहेत. तसेच, आपण दाखवलेल्या प्रेम आणि आपुलकीने मी लवकरच बरं होऊन परतेल, असा विश्वासही त्याने बोलून दाखवला. मोदींचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे.
Just had a successful heel operation on my achilles tendon! 👟 Recovery is going to take some time, but looking forward to getting back on my feet. #AchillesRecovery #HeelSurgery #RoadToRecovery pic.twitter.com/LYpzCNyKjS
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) February 26, 2024
शामीच्या टाचांवर सोमवारी लंडनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याने स्वत:च सोशल मीडियातून ही माहिती दिली. त्यानंतर, चाहत्यांनी त्याला लवकरे बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शमीला व्यक्तीगत ट्विट करुन लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा – Shiv Sena UBT : उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या; आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी
शमीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंवर लिहिले की, “माझ्या achilles tendon टाचवर नुकतेच यशस्वी ऑपरेशन झाले आहे! ते बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण मी माझ्या पायावर उभा राहण्यासाठी उत्सुक आहे.”, शमीच्या या पोस्टनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शमीची विचारपूस केली. ”तुम्हाला लवकरात लवकर बरे वाटावे आणि चांगले आरोग्य मिळावे ही इच्छा, मला विश्वास आहे की तुम्ही या दुखापतीवर धैर्याने मात कराल, जे तुमच्यात उपजतच आहे असे ट्विट मोदींनी केले आहे.
मोदींच्या ट्विटला शमीचा रिप्लाय
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांकडून मला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देणारी वैयक्तिक चिठ्ठी मिळणे हे आश्चर्यकारक आहे. त्यांचा हा आपलेपणा माझ्यासाठी खरोखर फार महत्त्वाचा आहे. मोदी सर, आपल्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद, असे मोहम्मद शमीने म्हटलं आहे. तसेच, मी लवकर बरे होऊन खेळात परतण्यासाठी कठोर परिश्रम करत राहीन. तुमच्या निरंतर शुभेच्छा, प्रेम आणि समर्थनासाठी सर्वांचे आभार, असेही शमीने म्हटले.