घरदेश-विदेशरा. स्व. संघाचे तिरंग्याशी जुने नाते... सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितला किस्सा

रा. स्व. संघाचे तिरंग्याशी जुने नाते… सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितला किस्सा

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. केंद्र सरकारतर्फे येत्या 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. मात्र यावरून विरोधकांनी भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तिरंगा फडकावण्यावरून निशाणा साधला आहे. त्याला सरसंघचालक मोहन भागवत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात, भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त नागरिकांनी आपल्या सोशल मीडियाच्या प्रोफाइलमध्ये तिरंग्याचे चित्र ठेवण्याचे आवाहन केले होते. तसेच येत्या 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकावून ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यावरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तिरंगा फडकावत नसल्यावरून टीका केली.

- Advertisement -

सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात या टीकेला सडेतोड उत्तर देताना, रा. स्व. संघाचे आपल्या राष्ट्रध्वजाशी कसा संबंध आहे, याचा किस्सा सांगितला. तिरंगा जेव्हा अस्तित्वात आला, तेव्हापासूनच संघाचा स्वयंसेवक त्या्च्याशी जोडला गेला आहे. सुरुवातीच्या काळात तर चक्राच्या जागी चरख्याचे चिन्ह होते. 1936मध्ये जळगावच्या फैजपूरमध्ये काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन होते. त्यात पहिल्यांदा तिरंगा फडकावण्यात येणार होता. त्यासाठी 80 फूटांचा खांब उभारण्यात आला होता. पंडित जवाहरलाल नेहरू अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यांनी हा झेंडा फडकावण्यासाठी दोरी खेचली. पण अर्ध्यावरच तो अडकला. त्यामुळे इतक्या उंचावर चढून तो सोडवण्याची हिम्मत कोणी केले नाही. त्यावेळी एक व्यक्ती त्या गर्दीतून पुढे आली आणि पटकन खांबावर चढून त्याने तो झेंडा सोडवला व वर नेला, असे मोहन भागवत यांनी सांगितले.

हेही वाचा – …आता भीतीपोटी वांती सुरू झाली, शिवसेनेची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

- Advertisement -

ती व्यक्ती खाली उतरल्यावर लोकांनी त्या व्यक्तीला खांद्यावर उचलून पंडित नेहरूंजवळ नेले. नेहरुंनी त्या व्यक्तीला शाबासकी दिली आणि संध्याकाळच्या खुल्या अधिवेशनाला येण्याचे निमंत्रण दिले. त्यात तुझे कौतुक केले जाईल, असे त्यांनी सांगितले. पण काही नेते तिथे आले आणि त्यांनी नेहरूंना सांगितले की, याला बोलवू नका. तो संघाच्या शाखेत जातो, असे सांगून सरसंघचालकांनी काँग्रेसच्या मनोवृत्तीवर अप्रत्यक्षपणे टिप्पणी केली.

ती व्यक्ती फैजपूरमध्ये राहणारे किशनसिंह राजपूत हे स्वयंसेवक होते. जेव्हा डॉ. केशव हेडगेवार यांना याची माहिती समजली तेव्हा त्यांनी फैजपूरला जाऊन राजपूत यांची भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन करत एक छोटा चांदीचा गडू बक्षीस म्हणून दिला, असे सांगत सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, अशा प्रकारे तिरंग्याच्या सन्मानासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक जोडला गेला आहे.

हेही वाचा – मविआच्या स्थापनेनंतरही युतीची चर्चा सुरू होती, पण राणेंमुळे मोडता; केसरकरांचा गौप्यस्फोट

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -