Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी देशातील मुस्लिमांचं सीएएमुळे कोणतंही नुकसान होणार नाही, मोहन भागवत यांचे वक्तव्य

देशातील मुस्लिमांचं सीएएमुळे कोणतंही नुकसान होणार नाही, मोहन भागवत यांचे वक्तव्य

सीएए आणि एनआरसीवर राजकीय फायद्यासाठी विरोध करण्यात येत आहे.

Related Story

- Advertisement -

राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत दोन दिवसीय असाम दौऱ्यावर आहेत. असाममध्ये एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी सीएए आणि एनआरसी च्या मुद्द्यावर वक्तव्य केलं आहे. या सीएए आणि एनआरसीवर राजकीय फायद्यासाठी विरोध करण्यात येत आहे. परंतु या कायद्यामुळे देशातील मुस्लिमांना कोणतंही नुकसान होणार नाही. तसेच भागवत यांनी म्हटलं आहे की, सीएए आणि एनआरसीशी देशातील नागरिकांचा काहीही संबंध नाही आहे. देशात कोरोनाच्या शिरकाव झाल्यानंतर चर्चेत असलेला सीएए आणि एनआरसीचा विषय बाजूला राहिला होता परंतु आता पुन्हा एकदा या विषयावर चर्चा सुरु झाली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं आहे की, १९३० मध्ये मुस्लिमांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न योजनेनुसार झाला होता. यामुळे काही लोकांनी विचार केला की, मुस्लिम आपली लोकसंख्या वाढवून आपले वर्चस्व प्रस्थापित करतील आणि या देशाला पाकिस्तान करतील. हा विचार प्रामुख्याने पंजाब, सिंध, असाम आणि बंगालच्याबाबतीत होता. यातही काही गोष्टी या सत्यातही आल्या आहेत. भारताचे विभाजन झाले आणि पाकिस्तान निर्माण झाला परंतु त्यांना जसा पाहिजे होता तसा तो झाला नसल्याचे मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं आहे की, सीएए हा कायदा देशातील कोणत्याही नागरिकांच्या विरोधात करण्यात आला आहे. भारतातील मुस्लिमांना सीएएमुळे कोणतंही नुकसान पोहचणार नाही. फाळणीच्या वेळी नागरिकांना आश्वासन दिले होते की, देशातील अल्पसंख्यांक नागरिकांची काळजी घेतली जाईल भारत अजूनही करत आहे परंतु पाकिस्तानकडून त्याचे पालन करण्यात आले नाही. देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या पंतप्रधानांनी सुद्धा म्हटलं आहे की, अल्पसंख्यांकांची काळजी घेतली जाईल आणि ते अताही अखंड सुरु आहे. पुढेही काळजी घेऊ असे आश्वासन मोहन भागवत यांनी दिले आहे.

- Advertisement -