Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी दादरा नगर हवेलीचे खासदार मोहनभाई डेलकर यांची आत्महत्या

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहनभाई डेलकर यांची आत्महत्या

मरिन ड्राईव्हमधल्या हॉटेलमध्ये आत्महत्या

Related Story

- Advertisement -

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहनभाई डेलकर यांनी आत्महत्या केली आहे. मरिन ड्राईव्ह परिसरातल्या सी ग्रीन व्ह्यू हॉटेलमध्ये आत्महत्या केली. मात्र, त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. सध्या ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

खासदार मोहनभाई डेलकर हे ५८ वर्षांचे होते. ते दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करत होते. भारतीय नवशक्ती पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि ते निवडूनही आले होते. १९८९ मध्ये पहिल्यांदा ते निवडून आले होते. त्यानंतर अनेकवेळा ते खासदारही राहिले होते. २००९ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र, लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती त्यामध्ये ते विजयी झाले होते. सात वेळा ते खासदार राहिले आहेत.

कोण होते खासदार मोहन डेलकर?

- Advertisement -

मोहन डेलकर हे दादरा नगर हवेलीचे एकमेव विद्यमान खासदार होते.

डेलकर यांनी कामगार संघटनेचा नेता त्यांची कारकीर्द म्हणून सुरु केली होती.

- Advertisement -

आदिवासी जनतेच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिला.

१९८५ मध्ये त्यांनी आदिवासी विकास संघटना स्थापन केली.

१९८९ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले, अपक्ष म्हणून त्यांनी दादरा आणि नगर हवेली मतदारसंघातून विजयी झाले होते.

१९९१ ते १९९६ दरम्यान दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले.

१९९८ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन, भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली.

त्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी पुन्हा अपक्ष लोकसभा निवडणूक लढवत विजय संपादन केला.

२००४ मध्ये भारतीय नवशक्ती पक्षाकडून ते पुन्हा लोकसभेवर गेले.

४ फेब्रुवारी २००९ मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

२०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेत, अपक्ष निवडणूक लढवली आणि पुन्हा एकदा खासदार झाले.

२०२० मध्ये मोहन डेलकर यांनी जनता दल युनायटेडमध्ये प्रवेश केला होता.

 

- Advertisement -