घरताज्या घडामोडीनोरा, जॅकलीननंतर श्रद्धा कपूर, शिल्पा शेट्टीचेही सुकेश चंद्रशेखरबरोबर कनेक्शन

नोरा, जॅकलीननंतर श्रद्धा कपूर, शिल्पा शेट्टीचेही सुकेश चंद्रशेखरबरोबर कनेक्शन

Subscribe

मनी लॉड्रींग केसमध्ये अडकलेल्या सुकेश चंद्रशेखरचे बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलीनबरोबर जवळचे संबंध असल्याचे समोर आले आहे. सध्या या दोघीजणी ईडीच्या रडारवर आहेत. याचदरम्यान सुकेशचे श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टीचेबरोबरही कनेक्शन असल्याचा खुलासा झाला आहे.

ईडीच्या चौकशीत सुकेशने श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टीबरोबर कनेकश्न असल्याचा खुलासा केला आहे. श्रद्धाला सुकेश २०१५ पासून ओळखतो त्याने एनसीबीच्या केससाठी श्रद्धाला मदत केल्याचे सांगितले आहे. सुशांत सिंग आत्महत्या ड्र्ग्ज प्रकरणात एनसीबीने श्रद्धाचीही चौकशी केली होती.

- Advertisement -

त्याचबरोबर सुकेशने असा दावा केला आहे की अभिनेता हरमन बावेजालाही तो ओळखत असून तो त्याचा जुना मित्र आहे. हरमनच्या कॅप्टन या चित्रपटाची निर्मितीही आपण करणार असल्याचं सुकेशने ईडीच्या चौकशीत सांगितलं. तसेच राज कुंद्राच्या पॉर्न केससंदर्भातही त्याने शिल्पा शेट्टीशी संपर्क केल्याचे  सांगितले. शिल्पा माझी मैत्रिण असून राज कुंद्राला जामिन मिळवण्यासंदर्भात शिल्पाला आपण संपर्क केल्याचे सुकेशने म्हटले आहे. सुकेशच्या या नव्या दाव्यामुळे बॉलीवूडकरांचे धाबे दणाणले आहे. नोरा, जॅकलीनंतर आता श्रद्धा कपूर, हरमन बावेजा, शिल्पा शेट्टी ईडीच्या रडारवर आल्या आहेत. सुकेश प्रकरणात नोरा आणि जॅकलीन अडकल्या आहेत. नोरा आणि जॅकलीनने सुकेशकडून महागडे गिफ्टस घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. जॅकलीन आणि सुकेश एकमेकांना डेट करत असल्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत. सुकेशने स्वत जॅकलीनबरोबर अफेयर असल्याचा खुलासा केला आहे. पण जॅकलीनने मात्र यास नकार दिला आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -