घरदेश-विदेशMallikarjun Kharge : काँग्रेसच्या खात्यातील पैसे चोरीला गेले; खर्गेंचा भाजपावर निशाणा

Mallikarjun Kharge : काँग्रेसच्या खात्यातील पैसे चोरीला गेले; खर्गेंचा भाजपावर निशाणा

Subscribe

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज दिल्लीतील रामलीला मैदानावर आज ‘इंडिया’ आघाडीच्यावतीने लोकशाही वाचवा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला संबोधित करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपावर निशाणा साधला. (Money stolen from Congress account Mallikarju Kharge targets BJP)

हेही वाचा – Sharad Pawar : लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर; इंडिया आघाडीच्या सभेत पवारांचे मोठे वक्तव्य

- Advertisement -

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, हा देश वाचवण्यासाठी, देशाची एकात्मता वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही सर्व नेते एका व्यासपीठावर आलो आहेत. कारण मोदींना लोकशाही नको आहे, त्यांची हुकूमशाही विचारसरणी आहे. काल राष्ट्रपती भवनात पंतप्रधान मोदींनी माझी भेट घेतली. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री शाह, नड्डा आणि जे.पी. नड्डाही तिथे होते. नड्डानी मला विचारले की, तुम्ही तुमचा निवडणूक प्रचार कधीपासून सुरू करत आहात आणि तुमची यादी कधी निश्चित होत आहे? त्यांना मी म्हणालो की, आमची यादी अंतिम केली जात आहे. मात्र निवडणुका निष्पक्ष होत नाहीत. आमची खाती गोठवली जात आहेत.

मी मोदींना सांगितले की, देशात निष्पक्ष निवडणुका होत नाहीत आणि काँग्रेसच्या खात्यातील पैसे आधीच चोरीला गेले आहेत. आम्हाला 3567 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. आम्ही 14 लाखांचा हिशेब न दिल्याने त्यांनी 135 कोटींचा दंड ठोठावला. यानंतर व्याज वाढतच गेले आणि ते इतके वाढले. आम्ही कुठेही प्रचार करू शकलो नाही. कोणाला भेटू शकलो नाही. आम्ही कार्यकर्त्यांना कुठेही पाठवू शकलो नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar : अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंमध्ये दिलजमाई; पेढा भरवत वाद मिटवला

मोदींची विचारधारा दूर केल्याशिवाय सुख-समृद्धी येणार नाही

भाजपाचे नाव न घेता मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, ते एक एक करून संस्था संपवत आहेत. ईडी असो, सीबीआय असो किंवा सीव्हीसी असो, या संस्थेचा ते गैरवापर करत आहेत. काँग्रेससोबत युती केली तर तुरुंगात पाठवणार, अशी धमकीही ते पक्षाच्या लोकांना देत आहेत. त्यामुळे मोदींची विचारधारा दूर केल्याशिवाय सुख-समृद्धी येणार नाही. संविधान असेल तर तुम्हाला तुमचे मूलभूत अधिकार मिळतील. नेहरू आणि बाबासाहेबांनी प्रत्येक व्यक्तीला हक्क दिला. स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकाला हक्क मिळाला. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाला एकसंध ठेवण्यासाठी आपले प्राण दिले, असेही मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -