घरदेश-विदेशउत्तर प्रदेशात माकडांचा हौदोस; १२ दिवसाच्या मुलाची केली हत्या!

उत्तर प्रदेशात माकडांचा हौदोस; १२ दिवसाच्या मुलाची केली हत्या!

Subscribe

माकडाने घरात घुसून महिलेच्या हातातील बाळ पळवून नेले. बाळाच्या आई-वडिलांनी माकडाचा पाठिंबा केले असता, त्याने बाळाला शेजारील घराच्या छतावर सोडले आणि पळ काढला. यामध्ये चिमुकल्याचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना माकडांनी हैराण केले आहे. परिसरातील माकडांनी धुडगूस घालण्याची परिसिमाच गाठली आहे. एका माकडाने सोमवारी उशिरा रात्री घरात घुसून महिलेच्या हातातील तिचे १२ दिवसांचे बाळ पळवून नेले. घरच्यांनी त्या बाळाला पकडण्यासाठी माकडाचा पाठलाग केला तेव्हा माकडाने शेजारील घराच्या छतावर बाळ सोडून पळ काढला. या पळवापळवीत चिमुकल्याचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आरुष असे आहे.

हेही वाचा – अजबच; उत्तर प्रदेशमध्ये माकडावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

- Advertisement -

नेमकं काय आहे प्रकरण?

सोमवारी रात्री उशिरापर्यंत आग्राच्या राष्ट्रीय महामार्ग दोन जवळील रनकाटा भागातील काचहारा ठोक कॉलनीमधील एक घर उघडेच होते. घरात एक आई आपल्या १२ दिवसांच्या चिमुकल्याला मांडिवर ठेऊन स्तनपान करत होती. त्यावेळी एक माकड घरात शिरला आणि त्याने मुलाची मान पकडून त्याला आईकडून हिसकावून घेतले. चिमुकल्याच्या आई-वडिलांनी माकडाचा पाठलाग केला असता माकडाने चिमुकल्याला शेजारच्या घराच्या छतावर सोडले आणि तेथून पळ काढला. दरम्यान, या घटनेमध्ये प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने मुलाचा मृत्यू झाला आहे.

आग्रा शहरात माकडांचा हौदोस वाढला

उत्तर प्रदेशाच्या आग्रा शहरात माकडांचा हौदोस वाढला आहे. येथील माकडे दिवसाढवळ्या नागरिकांवर हल्ले करत आहेत. या हल्ल्यांमध्ये नागरिकांना दुखापत होत आहे. ऐवढेच नाही, तर काहीजण या हल्लयांमध्ये दगावले देखील आहेत. दोन महिन्यांपूर्वी आग्राच्या एका कॉलनीतील लहान मुलावर माकडाने हल्ला केला होता. यामध्ये तो चिमुरडा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर अध्यापही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या महिन्यातही आग्राच्या एमजी रोडवर एक तरुण बाईक चालवत असताना त्याच्या गाडीसमोर अचानक माकडांचा घोळका आला. यावेळी तरुणाचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्याने रस्ता दुभाजकला धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

हेही वाचा – सर्पदंश झाल्यास, उत्तर प्रदेश सरकार देणार ४ लाख

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -