घरदेश-विदेशMonkeyPox alert : कोरोनानंतर देशात मंकीपॉक्सचा धोका; 'या' राज्याकडून अलर्ट जारी

MonkeyPox alert : कोरोनानंतर देशात मंकीपॉक्सचा धोका; ‘या’ राज्याकडून अलर्ट जारी

Subscribe

जगभरात कोरोनानंतर आता मंकीपॉक्स या नव्या आजाराची दहशत पाहायला मिळतेय. आत्तापर्यंत 219 हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनानंतर देशात मंकीपॉक्सचा शिरकाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. (Monkey Pox Advisory) अशात आता उत्तर प्रदेश सरकारने सर्व प्रथम मंकीपॉक्ससंदर्भात मार्गदर्शन सुचना जारी केल्या आहेत. (MonkeyPox Alert In UP)

मंकीपॉक्सबाबत या आहेत मार्गदर्शक सुचना 

मंकीपॉक्सने बाधित देशांमधून 21 दिवसांत परतलेल्या लोकांची तपासणी राज्यात केली जाईल. जर तो दुसऱ्या देशातील मंकी पॉक्सने बाधित रुग्णाच्या संपर्कात आला असेल आणि त्याला या आजाराची लक्षणे असतील तर त्याला ताबडतोब आयसोलेट केले जाईल. अशा लोकांचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV), पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जातील. अशा सुचना संसर्गजन्य रोग विभागाकडून जारी करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व विमानतळांवरही प्रत्येक प्रवाशांवर लक्ष केंद्रीत केले जाईल, यासाठी सनियंत्रण समित्यांनाही सतर्क करण्यात आले आहे. (UP Government)

- Advertisement -

मंकीपॉक्ससंदर्भात केंद्राकडून नियमावली जारी करण्यात येणार, केंद्र सरकार अलर्ट मोडवर

दरम्यान भारतात अद्याप तरी मंकीपॉक्सची (Monkey Pox) लागण झालेली एकही रुग्ण आढळलेला नाही. वैद्यकीय आणि आरोग्याचे महासंचालक डॉ. वेद ब्रत सिंग यांनी सांगितले की, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि युनायटेड किंगडम सारख्या देशांमध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग वेगाने पसरतोय. मंकीपॉक्स हा विषाणूजन्य अनुवांशिक आजार आहे. हा संसर्ग झालेल्या व्यक्तीला तापासोबत अंगावर पुरळ येतो. मंकीपॉक्स प्राण्यांपासून माणसात किंवा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो. हा विषाणू फाटलेली त्वचा, डोळे, नाक किंवा तोंडद्वारे शरीरात प्रवेश करतो.

मंकीपॉक्स आजार असाप्रकारे पसरतो 

हा संसर्ग प्राण्याच्या चावण्याने किंवा शरीरावर ओरखडे काढल्याने, वन्य प्राण्यांच्या मांसाशी थेट संपर्क आल्याने, शारीरिक द्रव किंवा जखमेच्या सामग्रीद्वारे किंवा दूषित बिछान्याद्वारे प्राण्यांपासून मानवांना होऊ शकतो. दुसरीकडे, मोठ्या आकाराच्या रेस्पायरेटरी ड्रॉपलेट्सच्या थेट संपर्कात येऊन किंवा संक्रमित व्यक्तीच्या जखमेच्या स्त्रावच्या थेट संपर्कात येऊन तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रसारित केला जाऊ शकतो. त्याची लक्षणे चेचक या आजारासारखीच असतात. माणसांना सात ते 14 दिवस किंवा 21 दिवसांपर्यंत या संसर्गाची लक्षणे दिसू शकतात.

- Advertisement -

पुरळ दिसण्यापूर्वी एक किंवा दोन दिवस पुरळ पडेपर्यंत संक्रमित व्यक्ती संक्रमित राहू शकते. म्हणजेच, तो दुसऱ्या व्यक्तीला संक्रमित करू शकतो. सर्व जिल्ह्यांमध्ये नियंत्रण पथकांना सतर्क करण्यात आले आहे. संशयित रुग्णाच्या वेसिकल्समधील द्रव, रक्त, श्लेष्मा इत्यादींचे नमुने तपासणीसाठी पाठवले जातील. या संसर्गजन्य रोगाचा मृत्यू दर एक टक्क्यांपासून ते 10 टक्क्यांपर्यंत आहे. (UP issues advisory on monkeypox)


ठाण्यात वागळे इस्टेटमध्ये लागलेल्या आगीवर अखेर तीन तासांनी नियंत्रण; ७ गाळे जळून खाक

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -