घरCORONA UPDATEयुरोपमध्ये monkeypox आजाराचे थैमान, महामारी घोषित करण्यावरून वाद

युरोपमध्ये monkeypox आजाराचे थैमान, महामारी घोषित करण्यावरून वाद

Subscribe

सध्या युरोपमधील बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन आणि युकेम अशा 9 देशांमध्ये या आजाराने थैमान घातले आहे.

जगभरात मंकीपॉक्स (Monkeypox) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. युरोपमध्ये तर या आजाराने धोक्याची सुचना दिली आहे. युरोपमध्ये पहिल्यांदाच मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. आत्तापर्यंत सुमारे 100 मंकीपॉक्सचे रुग्ण एकट्या युरोपमध्ये आढळून आले आहेत. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) तातडीची बैठक आयोजित केली, या बैठकीत अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत मंकीपॉक्स आजाराला महामारी घोषित करायचे की नाही यावरही विस्तृत चर्चा झाली. मात्र या आजाराला महामारी घोषित करण्यावरून वादाला सुरुवात झाली आहे.  (Monkeypox cases investigated in Europe)

सध्या युरोपमधील बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन आणि युकेम अशा 9 देशांमध्ये या आजाराने थैमान घातले आहे. याशिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्येही मंकीपॉक्स रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होतेय. परंतु या वाढत्या रुग्णसंख्येवर आरोग्य तज्ज्ञांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले कीस हा रोग महामारी बनणार नाही कारण तो कोरोनाप्रमाणे वेगाने पसरत नाही. यामुळे संसर्ग होणे देखील तितके शक्य नाही. (Monkeypox cases in Europe)

- Advertisement -

यावर रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर फॅबियन यांनी सांगितले की, ही महामारी दीर्घकाळ पसरणे कठीण आहे. या रोगाची प्रकरणे सहजपणे वेगळी केली जाऊ शकतात, एकाच ठिकाणी प्रतिबंधित केली जाऊ शकतात. लस देखील मंकीपॉक्सचा (Monkeypox cases) प्रभाव लक्षणीयरीत्या कमी करू शकतात. परंतु डब्ल्यूएचओचे युरोपियन प्रमुख या मंकीपॉक्सबद्दल अधिक चिंतेत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, युरोपमधील लोक जर जास्त पार्ट्यांमध्ये सहभागी झाले, उन्हाळ्यात सुट्टी घालवण्यासाठी गेले, तर हा आजार अधिक पसरण्याची शक्यता आहे.

Monkypox: कोरोनानंतर जगाला आता ‘मंकीपॉक्स’चा धोका, नेमका आहे कसा हा विषाणू?

मंकीपॉक्स आजार नेमका आला कुठून?

दरम्यान युरोपियन (Europe) देशांमध्ये मंकीपॉक्सचा पहिला केस 7 मे रोजी समोर आला होता. ती व्यक्तीही नायजेरियातून आली होती. मंकीपॉक्सची सर्वाधिक प्रकरणे आफ्रिकन देशांमध्ये आढळून येत आहेत. 2017 पासून याठिकाणी ही प्रकरणे वाढत आहेत. पण चिंताजनक ट्रेंड म्हणजे आता या देशानंतर युरोपही मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून येत आहेत. (monkeypox disease)

- Advertisement -

आत्तापर्यंत झालेल्या संशोधन असे सिद्ध झाले की, चेचक या आजाराविरुद्ध वापरलेली लस मंकीपॉक्सवर प्रभावी ठरत आहे. त्यातील 85 टक्के लस प्रभावी मानली गेली आहे. मात्र या आजारामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्येही कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नसल्याते समोर आले आहे.

Monkey B Virus: चीनमध्ये मंकीपॉक्सच्या पहिल्या रूग्णाचा मृत्यू, अमेरिकेतही रूग्ण आढळला

मंकीपॉक्स आजाराची लक्षणे  (monkeypox disease symptoms)

मंकीपॉक्स (Monkeypox Europe) आजाराच्या लक्षणांबद्ल सांगायचे झाल्या, या आजाराचा संसर्ग झाल्यानंतर पाच दिवसांत ताप, तीव्र डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायू दुखणे आणि थकवा यांसारखी लक्षणे दिसतात. मंकीपॉक्स सुरुवातीला चिकनपॉक्स, गोवर किंवा चेचक सारखा दिसतो. एक ते तीन दिवस ताप आल्यावर त्याचा परिणाम त्वचेवर दिसू लागतो. शरीरावर पिंपल्स येतात. हात, पाय, तळवे, पायाचे तळवे आणि चेहऱ्यावर लहान मुरुम दिसतात. हे मुरुम जखमासारखे दिसतात आणि स्वतःच सुकतात आणि पडतात.


हेही वाचा : यंदा फक्त 237 दिवस शाळा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -