घरताज्या घडामोडीMonsoon 2021 update: यंदा मान्सून १ जून रोजी केरळ तर १५ ते...

Monsoon 2021 update: यंदा मान्सून १ जून रोजी केरळ तर १५ ते २० जून दरम्यान महाराष्ट्रात होणार दाखल

Subscribe

सध्या कडक उन्हाच्या तडाक्याने सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. घामाच्या धारांनी कंटाळलेल्या महाराष्ट्रासाठी आणि देशातील बळीराजासाठी दिलासादायक बातमी आहे. यंदा वेळेत मान्सूनचे आगमन होणार आहे. मान्सून १ जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासह १० जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होणार असून १५ ते २० जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज आहे, अशी शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

- Advertisement -

हवामान विभागाच्या मते, यंदा मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण असून यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार आहे तर जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून हजेरी लावणार असून नागरिकांना चिंब भिजवणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या १५ मे आणि ३१ मे रोजी पावसाची अधिकृत शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सूनला विलंब झाला होता. मात्र यंदा अशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही मान्सूची एन्ट्री वेळेवर होणार असल्याचे सांगितले जात आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन राजीवन यांनी मान्सूनसंदर्भातील ट्वीट करून अशी माहिती दिली आहे.  यासह भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशातील अधिक भागांत सामान्य मान्सून असणार आहे. तर ९८ टक्के पावसाची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यताही स्कायमेटने वर्तविली आहे.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -