Monsoon Update : खुशखबर! मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात 3 दिवस आधीच दाखल

दरवर्षी साधारण मान्सून हा अंदामानमध्ये 22 मे रोजी दाखल होत असतो. मात्र यंदा (2023) तीन दिवस आधीच मान्सून अंदमानातील काही भागांत दाखल झाल्याची माहिती मिळते.

मान्सूनच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांसाठी एक खुशखबर आहे. नैऋत्य मान्सून आता अंदमान समुद्राच्या काही भागात दाखल (Monsoon) झाला आहे. याबाबत भारतीय हवामान विभागाने माहिती दिली असून, पुढील 3 ते 4 दिवसात दक्षिण बंगालच्या उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान, निकोबारच्या आणखी काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचीही माहिती हवामान विभागाने दिली आहे.

दरवर्षी साधारण मान्सून हा अंदामानमध्ये 22 मे रोजी दाखल होत असतो. मात्र यंदा (2023) तीन दिवस आधीच मान्सून अंदमानातील काही भागांत दाखल झाल्याची माहिती मिळते. (monsoon arrives south andaman sea three days earlier and will enter the bay of bengal)

हवामान विभागाच्या माहितीनुसार, यावर्षी मान्सूनचे आगमन 4 दिवस उशीरा होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे दरवर्षी 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यावर्षी 4 जून रोजी दाखल होणार आहे.

हेही वाचा – IMD म्हणते, मान्सूनला चार दिवस होणार उशीर; स्कायमेटच्या अंदाजानंतर वर्तवली शक्यता

दरम्यान, स्कायमेट या खाजगी एजन्सीच्या अंदाजानुसार, अंदमानात मान्सून उशिराने दाखल होणार आहे. यंदा मान्सूनची सुरुवात कमकुवत असून, तो विलंबाने दाखल होईल. तसेच, महाराष्ट्रात 9 जून आणि मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.

केरळात मान्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज असला तरी, 4 जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 9 तारखेपर्यंत आणि मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज आहे.


हेही वाचा – ठाकरे गट, संभाजी ब्रिगेडचे संयुक्त मेळावे; ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट