घरदेश-विदेशआला रे आला ! मान्सून केरळात आला !

आला रे आला ! मान्सून केरळात आला !

Subscribe

मे महिना संपत आला की सर्वांना उत्सुकता लागते ती ‘त्याच्या’ आगमनाची ! त्याच्या पहिल्या भेटीत ‘ओलेचिंब’ होण्याची ! त्याच्या साथीने मातीचा सुगंध घेण्याची. शिवाय उकाड्यापासून दिलासा मिळण्याची ! आता तुमच्या या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत. कारण, आपण सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहतोय तो ‘मान्सून’ अखेर केरळात दाखल झाला आहे. स्कायमेटने हा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे उकाड्यापासून लवकरच सर्वांची सुटका होणार आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सून पुढील २४ तासांत केरळात दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. केरळात मान्सूनसारखी स्थिती आहे. त्यामुळे पावसाळा सुरू झाला, असे स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन सिंह यांनी म्हटले आहे.

मान्सून ७ जुनचा मुहूर्त साधणार?

- Advertisement -

अंदमानात दाखल झाल्यानंतर मान्सून पुढे केरळात दाखल होतो. त्यानंतर अनुकूल वातावरण राहिल्यास मान्सूनचा राज्यातला प्रवास देखील निर्धोक होतो. साधारण ७ जुन ही मान्सूनची केरळात दाखल होण्याची तारीख. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे चक्र पुढे सरकलेले आहे. त्यामुळे, मान्सून केरळात दाखल झाल्यामुळे ७ जुनचा मुहूर्त साधणार का? याकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. वातावरण अनुकूल राहिल्यास पुढील ८ दिवसांत मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

केरळासह राज्यातल्या अनेक भागात मागील काही दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. त्यामुळे पावसाळा यंदा लवकर आहे बुवा, अशा प्रतिक्रिया नागरिकांमध्ये ऐकायला मिळत होत्या. केरळात मान्सूनसारखी स्थिती असून यंदाचा पावसाळा सुरू झाला, असे म्हणायला काहीच हरकत नाही असे, स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन सिंह यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यात मान्सून केव्हा दाखल होणार याकडे आता बळीराजासह सर्वांचे ‘चातक’ पक्ष्याप्रमाणे वाट पाहत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -