घरदेश-विदेशMonsoon Update : केरळमध्ये आज मान्सून दाखल होण्याची शक्यता; राज्यात 'या' भागात...

Monsoon Update : केरळमध्ये आज मान्सून दाखल होण्याची शक्यता; राज्यात ‘या’ भागात पावसाच्या सरी, IMD अंदाज काय?

Subscribe

भारतात नैऋत्य मान्सून श्रीलंकेत पोहोचला असून तो केरळ किनारपट्टीकडे सरकत आहे. त्यामुळे केरळमध्ये आज मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. यामुळे मान्सून  (Monsoon Rain) पुढील 48 तासांत मालदीव, लक्षद्वीप येथे पोहोचणे अपेक्षित आहे. असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यात येत्या दोन दिवसांत केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. (Monsoon Update News)

IMD च्या अंदाजानुसार, केरळच्या दिशेने नैऋत्य मान्सूनच्या (Meteorological Department) प्रगतीवर पूर्ण लक्ष ठेवले जात आहे. साधारणपणे 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. आता तो 4 दिवस आधी पोहोचणे अपेक्षित आहे. काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात असानी या चक्रीवादळीमुळे नैऋत्य मोसमी पावसाने वेग घेतला असल्याचे हवामान विभागाचे मत आहे. (Monsoon 2022)

- Advertisement -

Pre Monsoon Rain : राज्यातील काही भागात मान्सून दाखल, बळीराजाला मोठा फटका

पुढील तीन ते चार दिवसांत दिल्लीच्या तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Forecast) वर्तवली आहे. या दरम्यान तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. दरम्यान उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये पावसाची शक्यता आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, जम्मू- काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणामध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे. (Monsoon In India)

महाराष्ट्रातील अनेक भागात मान्सूनचे आगमन

दरम्यान महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. दरम्यान आज मुंबईतील बोरिवली, कांदिवली, दहिसर भागात अचानक मध्यम पावसाच्या सरी बरसू लागल्या, तर नवी मुंबईतील घनसोली आणि इतर भागात आज पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान ठाण्यातही अचानक मुसळधार पावासच्या सरी बरसल्या. परिणामी मध्य रेल्वे वाहतूकीवर त्याचा परिणाम दिसून आला. मध्य रेल्वे वाहतूक सध्या 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहे.

- Advertisement -

मुंबईत दरवर्षी पावसात भीषण आपत्तीजनक घटना घडत असतात. पावसाळ्यात मुंबईतील सखल भागात पाणी साचण्याची सर्वात मोठी समस्या कायम आहे. एवढेच नाही तर दरड कोसळण्याची भीतीही आहे. याबाबत आता बीएमसीने लोकांना आधीच इशारा दिला आहे. मुंबईची नागरी संस्था बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने शहरातील भूस्खलन प्रवण भागात झोपडपट्टी रहिवाशांसाठी एक नवीन इशारा जारी केला आहे. यात त्यांनी म्हटले की, नागरी संस्थेने एस-वॉर्ड उतार असलेल्या भागातील रहिवाशांना लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी वर्तवलेल्या मान्सूनचा अंदाज पाहता पालिका प्रशासनाचा हा इशारा आला आहे.

मान्सून दोन दिवसात अरबी समुद्रात दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज

‘या’ भागांना देण्यात आला इशारा

बीएमसीने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्तीमुळे कोणतीही दुर्घटना किंवा जीवित आणि मालमत्तेची हानी झाल्यास ती जबाबदार राहणार नाही. एस वॉर्डांतर्गत येणाऱ्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे – विक्रोळी पश्चिममधील सूर्या नगर, पवईतील इंदिरानगर, गौतम नगर, पासपोली, जयभीम नगर, गौतम नगर, रमाबाई आंबेडकर नगर 1 आणि 2 भांडुप पश्चिम, नरदास नगर, गोंदवी टेकडी, गावदेवी. मार्ग, टेंभीपारा, रावते कंपाऊंड, खिंडीपाडा, रामनगर, हनुमान नगर, अशोक टेकडी, नवजीवन सोसायटी, तानाजी वाडी, दर्गा रोड. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे भूस्खलन आणि घरांची पडझड आणि जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता वाढते. गेल्या वर्षी विक्रोळीतील सूर्यानगर झोपडपट्टीत दरड कोसळून १० जणांचा मृत्यू झाला होता.


हेही वाचा : कुत्र्याला फिरवण्यासाठी स्टेडियम रिकामी करणं IAS संजीव खिरवारांच्या अंगलट! लडाखमध्ये झाली बदली


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -