घरताज्या घडामोडीखुशखबर! यंदा ४ जूनला केरळात मान्सून दाखल होणार; हवामान विभागाचा अंदाज

खुशखबर! यंदा ४ जूनला केरळात मान्सून दाखल होणार; हवामान विभागाचा अंदाज

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, नागरिकांसाठी आता एक दिलासादायक बातमी आहे. येत्या 4 जूनला मान्सून केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मागील अनेक दिवसांपासून उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, नागरिकांसाठी आता एक दिलासादायक बातमी आहे. येत्या 4 जूनला मान्सून केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शिवाय, मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्यामुळे येत्या 2-3 दिवसांमध्ये उत्तर भारतात चांगल्या पावसाची शक्यता आहे, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Monsoon Will Enter Kerala On June 4 This Year Prediction Of Meteorological Department)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 4 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. यंदा देशात मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, मान्सून 4 जूनच्या आसपास केरळमध्ये पोहोचेल. यंदा मान्सून 96 टक्के राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, वायव्य भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून 96 टक्के राहण्याचा अंदाज आहे. पावसाळ्यात अल निनोची शक्यता 90 टक्के पेक्षा जास्त आहे.

- Advertisement -

तत्पूर्वी गुरुवारी भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सोमा सेनरॉय यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, अल निनो राहील आणि हिंदी महासागर द्विध्रुव सकारात्मक राहील असा आमचा अंदाज आहे. युरेशियन बर्फाची चादरही आपल्यासाठी अनुकूल आहे. एल निनोचा परिणाम नक्कीच दिसून येईल. पण मला असे म्हणायचे आहे की, मान्सूनवर फक्त एका घटकाचा परिणाम होत नाही. आपल्या मान्सूनवर दोन-तीन जागतिक घटक आहेत. जे मान्सूनवर परिणाम करतात. त्यात अल निनो अनुकूल नाही पण हिंदी महासागर द्विध्रुवीय अनुकूल आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन आम्ही मान्सून सामान्य राहण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मागील 16 मान्सून हंगामात जेव्हा एल निनो आला आहे, तेव्हा असे दिसून आले की, 9 वेळा मान्सून सरासरीपेक्षा कमकुवत राहिला आहे. तसेच, उर्वरित 7 वेळा मान्सून सामान्य राहिला आहे. एल निनो हा एकमेव घटक नाही जो जागतिक वाऱ्याच्या नमुन्यांवर परिणाम करतो. अटलांटिक निनो, हिंद महासागर द्विध्रुव आणि युरेशियन बर्फाचे आच्छादन इत्यादी इतर घटक आहेत जे मान्सूनवर परिणाम करू शकतात.

- Advertisement -

सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की एल निनोमुळे 1982-83 आणि 1997-98 मध्ये जागतिक उत्पन्नात $4.1 ट्रिलियन आणि $5.7 ट्रिलियन पर्यंतचे नुकसान झाले आहे. संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की 21 व्या शतकाच्या अखेरीस जागतिक आर्थिक नुकसान $84 ट्रिलियन पर्यंत असू शकते.


हेही वाचा – मोठी बातमी! मुंबईतील झोपडपट्टीधारकांना मिळणार 2.5 लाखांत घर; फडणवीसांची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -