घरताज्या घडामोडीMonsoon Withdraw : १९६० नंतर यंदा मॉन्सूनचा परतीचा प्रवास उशिराने, तारीख ठरली

Monsoon Withdraw : १९६० नंतर यंदा मॉन्सूनचा परतीचा प्रवास उशिराने, तारीख ठरली

Subscribe

भारतात यंदाच्या मॉन्सूनमध्ये सामान्य अशा स्वरूपाचा पाऊस झाला. सलग तिसऱ्या वर्षी मॉन्सूनच्या पॅटर्नमध्ये झालेला बदल पहायला मिळाला. जून ते सप्टेंबर या कालावधीत चार महिन्यात दक्षिण पश्चिम मॉन्सूनच्या यंदाच्या हंगामात सामान्य अशा स्वरूपातील पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचे हे भारतातले सलग तिसरे वर्ष आहे. सामान्यपणे १७ सप्टेंबरपासून भारतात मॉन्सून परण्यासाठी सुरूवात होते. पण यंदा मात्र मॉन्सून परतण्यासाठी विलंब झालेला पहायला मिळत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने दक्षिण पश्चिमी मॉन्सूनचे महत्व अधिक आहे. कारण याच मॉन्सूच्या जोरावरच देशातील अनेक राज्यात शेतीशी संबंधित अनेक उलाढालीचे यश एकट्या या पावसाच्या जोरावर अवलंबून असते.

यंदा ६ ऑक्टोबरपासून मॉन्सून परतणार

प्रादेशिक हवामान केंद्राचे (IMD) चे महानिदेशक मृत्युंजय महापात्रा यांच्या माहितीनुसार उत्तर पश्चिम भारतात काही भागात ६ ऑक्टोबरपासून दक्षिण पश्चिम मॉन्सून परतण्यासाठीची सुरूवात होईल. त्यासाठीचे अनुकुल वातावरण सध्या आहे. 1960 नंतर दुसऱ्यांदा मॉन्सून इतक्या उशिरा परतण्यासाठीची सुरूवात होणार आहे. याआधी २०१९ मध्ये मॉन्सून परतण्यासाठीचा प्रवास उशिरा सुरू झाला होता. २०१९ मध्ये ९ ऑक्टोबरला मॉन्सून परतण्याची सुरूवात झाली होती. मॉन्सून परतण्यासाठी होणारा विलंब हादेखील एक रेकॉर्ड आहे. यंदाच्या वर्षीचा उत्तर पूर्व मॉन्सूनही सामान्य असेल असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. नॉर्थ ईस्ट मॉन्सून देशातील दक्षिणेकडील राज्यात होत असतो. तसेच ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मॉन्सून याठिकाणी सक्रीय असतो.

- Advertisement -

मॉन्सून परतण्याचा पॅटर्न बदलतोय ?

IMD च्या मे २०२० च्या एका अहवालानुसार १९७१ ते २०१९ या कालावधीत मॉन्सून परतण्यासाठीचा जो अंदाज वर्तवण्यात आला होता, त्यानुसार मॉन्सून परतला. पण १९०१ ते १९४० या वर्षातील आकडेवारीत अंतर आहे. दिल्लीत मॉन्सून परतण्याचा १९०१ ते १०४० या कालावधीतील तारीख २१ सप्टेंबर राहिली होती. तर १९७१ ते २०१९ या कालावधीत मॉन्सून परतण्याचा कालावधीत २५ सप्टेंबर होता. २०१९ पासून मॉन्सून परतण्याच्या कालावधीत २०१९ दिवसांचे अंतर होते. मॉन्सून परतण्याच्या कालावधीत दोन आठवड्यांचे अंतर दिसून आले आहे. दक्षिण पश्चिमी मॉन्सूनच्या परतण्याची सरासरी तारीख ही १ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर असते.

आयएमडीच्या अभ्यासानुसार मॉन्सूनचा परतण्याचा कालावधी हा अतिशय वेगवान पद्धतीचा असतो. त्यामुळे मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला उशीर झालेल्या असला तरीही हा कालावधी कमाल १५ ऑक्टोबर असेल. सध्याचा अंदाज हा १९०१-१९४० या कालावधीतील आहे. त्यामध्ये बदल करतानाच १९६१ ते २०१९ या कालावधीतील आकडेवारीच्या आधारावर मॉन्सूनच्या परतण्याची नवीन तारीख घोषित करण्याची सध्या गरज आहे.

- Advertisement -

सलग तिसऱ्या वर्षी जास्त पावसाची नोंद 

सलग तिसऱ्या वर्षी भारतात सरासरी पावसाची नोंद झाली आहे. २०१९ आणि २०२० मध्ये सामान्यपेक्षा पावसाचे प्रमाण अधिक होते. देशात यंदा जूनमध्ये ११० टक्के पाऊस झाला, तर जुलैमध्ये ९३ टक्के आणि ऑगस्टमध्ये ७६ टक्के झाला. या तीन महिन्यात देशात सर्वाधिक पाऊस होतो. यंदा ऑगस्टमध्ये कमी झालेल्या पावसाची भरपाई सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने झाली. यंदा पावसाचा १३५ टक्के इतका नवा रेकॉर्ड सप्टेंबरमध्ये नोंदवला गेला.

कुठे, किती पाऊस ?

यंदा नागालॅंड, मणिपुर, मिजोरम, त्रिपुरा, आसाम, मेघालय, अरूणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, पश्चिम उत्तर प्रदेश आणि लक्षद्वीप या भागात कमी पाऊस झाला. तर पश्चिम राजस्थान, हरियाणा, दिल्ली, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पश्चिम बंगा, कोकण, गोवा, मराठवाडा आणि अंदमान व निकोबार येथे मॉन्सून सरासरीपेक्षा अधिक झाला. यंदा देशात मॉन्सून दोन दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मॉन्सूनचा मध्य, पश्चिम, पूर्व आणि पूर्वोत्तर आणि दक्षिण भारत असा वेगवान प्रवास पहायला मिळाला.


हेही वाचा – राज्यात पुढील चार दिवस मुसळधार

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -