घरदेश-विदेशदेशातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू

देशातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू

Subscribe

दक्षिण पश्चिमी मौन्सूनने आजपासून राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू केला आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने याबाबतची माहिती जाहीर केली आहे. राजस्थानमध्ये परतीच्या मॉन्सूनला सुरूवात होण्यासाठी वातावरण आता पोषक ठरत आहे. म्हणूनच आता राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगढ, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यासारख्या भागातून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली आहे. येत्या दोन दिवसात आणखी राज्यांमधून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल.

देशातल्या उत्तर पश्चिमी भागातही कोरड्या वातावरणाला सुरूवात झाली आहे. यंदा मॉन्सूनचा परतीचा प्रवास ११ दिवस उशिराने सुरू झाला आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने जाहीर केलेल्या तारखेपेक्षा ११ दिवस उशिरा यंदा मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. एप्रिल महिन्यातच प्रादेशिक हवामान केंद्रामार्फत तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार १७ सप्टेंबरपासून मॉन्सून परतीचा प्रवास सुरू करेल असे अपेक्षित होते. तर संपुर्णपणे मॉन्सून संपण्याची तारीख १५ ऑक्टोबर देण्यात आली होती. गेल्या वर्षीपर्यंत मॉन्सून परतीचा प्रवास सुरू होण्याची तारीख ही १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यानची होती. पण यंदाच्या वर्षात पहिल्यांदाच मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबल्याची माहिती प्रादेशिक हवामान केंद्राने जाहीर केली आहे.

- Advertisement -

गेल्या पाच वर्षांपासून १५ सप्टेंबर नंतरच परतीच्या मॉन्सूनचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत होते. मात्र यंदा तारखा बदलण्यात आल्याची कबुली प्रादेशक हवामान केंद्राने दिली आहे. गेल्यावर्षी ९ ऑक्टोबरपासून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. गेल्या वर्षी १ सप्टेंबर ही तारीख जाहीर करण्यात आली होती. पण यंदा ही तारीख १७ ऑक्टोबर अशी झाली आहे. संपुर्ण देशभरात यंदा सरासरीपेक्षा ९ टक्के जास्त पाऊस झाला आहे. दक्षिण भारतात ३० टक्के, मध्य भारतात १६ टक्के, उत्तर पश्चिम भारतात १५ टक्के सरासरीपेक्षा कमी तर पूर्व आणि उत्तरपूर्व भारतात ७ टक्के इतक्या अधिक मॉन्सूनची नोंद यंदाच्या मौसमात झालेली आहे.

परतीच्या मॉन्सूनचे हे आहेत संकेत

परतीच्या मॉन्सूनचे मुख्यत्वेकरून तीन मुख्य संकेत आहेत. त्यामध्ये मुख्य संकेत म्हणजे त्या भागात पाच दिवसात पावसाची हजेरी पूर्णपणे बंद होते. दुसरा संकेत म्हणजे सोसाट्याचे वारे वाहू लागतात. तसेच वातावरणातील बाष्पाचे प्रमाण कमी होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -