घरदेश-विदेशनवा अध्यक्ष शोधण्यास महिन्याची मुदत

नवा अध्यक्ष शोधण्यास महिन्याची मुदत

Subscribe

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून काँग्रेसचे नेते प्रयत्नशील आहेत. मात्र राहुल गांधींनी त्यांना दाद लागू दिलेली नाही. एक महिन्यात अध्यक्षपदाचा निर्णय घ्या, असे सांगत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदापासून प्रियांका गाधी यांनाही दूर ठेवण्याचे निर्देश दिले असल्याचे सुत्रांकडून समजते.

मंगळवारी सकाळपासून राहुल गांधींना भेटण्यासाठी प्रियंका गांधी, रणदीप सुरजेवाला, सचिन पायलट हे दाखल झाले होते. त्यांनी राहुल गांधी यांची समजूत काढली. मात्र, मी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचे मन बनवले आहे. तुम्ही एक महिन्याची मुदत घ्या, पण माझा पर्याय निवडा, असे राहुल गांधी यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत एका ज्येष्ठ नेत्याला सांगितल्याचे वृत्त आहे. तसेच प्रियंका गांधी यांना या सर्वांपासून दूर ठेवा. त्या कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार नाहीत, असेही राहुल गांधी यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.

- Advertisement -

दरम्यान, लोकसभेमध्ये मी पक्षाचे नेतृत्व करण्यास तयार आहे. तसेच मी कुठल्याही अन्य भूमिकेमध्येही काम करण्यास तयार आहे. पक्षाला भक्कम करण्यासाठी मी काम करत राहीन. मात्र अध्यक्षपदावर राहणार नाही, असेही राहुल गांधींनी सांगितल्याचे वृत्त आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 52 जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद सोडावे आणि गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे पक्षाची धुरा द्यावी, तसेच स्वत: पक्षाचे काम करत राहावे, अशी राहुल गांधी यांची योजना आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -