घरअर्थजगतजीएसटी संकलनात २६ टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पुन्हा अव्वल; कोणत्या राज्यातून किती मिळाले?

जीएसटी संकलनात २६ टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पुन्हा अव्वल; कोणत्या राज्यातून किती मिळाले?

Subscribe

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात एकूण जीएसटी संकलनात 25,271 कोटी रुपये सीजीएसटी (CGST) आणि 31,813 कोटी रुपये एसजीएसटी (SGST) तर 80,464 कोटी रुपये आयजीएसटी (IGST) इतकी रक्कम जमा झाली आहे. यामध्ये वस्तूंच्या आयातीवर आकारण्यात आलेल्या 41,215 कोटी रुपये रकमेचाही समावेश आहे.

नवी दिल्ली – सप्टेंबर महिन्यातील १.४ लाख कोटींहून अधिक करसंकलन झाले आहे. सलग सातव्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक जीएसटी जमा झाला आहे. गेल्या सात महिन्यापासून जीएसटीचे १.४ लाख कोटींपेक्षा अधिक संकलन होत आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा २६ टक्के अधिक जीएसटी संकलन झाले असून गेल्यावर्षी याच महिन्यात जमा झालेल्या संकलनापेक्षा या महिन्यात २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जून महिन्यात १ लाख ४४ हजार ६१६ कोटींचा जीएसटी कर जमा झाला होता. जुलै २०२२ मध्ये १.४८ लाख कोटींहून अधिक जीएसटी जमा झाला होता. तर, ऑगस्टमध्ये १.४९ लाख कोटी जीएसटी संकलनाची नोंद झाली होती. गेल्या सात महिन्यांपासून रेकॉर्डब्रेक जीएसटी संकलन होतंय.

- Advertisement -

हेही  वाचा – दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या किमती घसरल्या, जाणून घ्या आजचे दर

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात एकूण जीएसटी संकलनात 25,271 कोटी रुपये सीजीएसटी (CGST) आणि 31,813 कोटी रुपये एसजीएसटी (SGST) तर 80,464 कोटी रुपये आयजीएसटी (IGST) इतकी रक्कम जमा झाली आहे. यामध्ये वस्तूंच्या आयातीवर आकारण्यात आलेल्या 41,215 कोटी रुपये रकमेचाही समावेश आहे.

- Advertisement -

सप्टेंबर 2022 मध्ये जमा झालेला GST महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यात गोळा केलेल्या GST महसुलापेक्षा 26 टक्के अधिक आहे. या महिन्यात, वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल 39 टक्क्यांनी जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) संकलित केलेला महसूल मागील वर्षाच्या याच महिन्यातील महसुलापेक्षा 22 टक्क्यांनी जास्त आहे.

हेही वाचा – कर्जाचे हप्ते आणखी महागणार, आरबीआयने रेपो रेटमध्ये केली वाढ

महाराष्ट्र पुन्हा अव्वल

महाराष्ट्रात सप्टेंबर २०२१ मध्ये १६ हजार ५८४ कोटींचं जीएसटी संकलन झालं होतं. तर, या वर्षी २९ टक्क्यांनी संकलन वाढून २१ हजार ४०३ कोटी रुपये संकलन झालं आहे. तर, यंदाही सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातच सर्वाधिक करसंकलन झालं आहे.

हेही वाचा – PPF-SSY सुकन्या समृद्धी गुंतवणूकदारांसाठी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

कोणत्या राज्यातून किती कलेक्शन?

  • दिल्ली – ४.७४१ कोटी
  • हरियाणा- ७ हजार ४०३कोटी
  • राजस्थान- ३३०७ कोटी
  • उत्तर प्रदेश – ७००४ कोटी
  • पश्चिम बंगाल – ४८०४ कोटी
  • ओडिसा – ३७६५ कोटी
  • गुजरात – ९०२०कोटी
  • महाराष्ट्र – २१,४०३ कोटी
  • कर्नाटक – ९७६० कोटी
  • तमिळनाडू – ८६३७ कोटी
  • आंध्र प्रदेश – ३१३२ कोटी
Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -