घरअर्थजगतमूडीजने भारताचं रेटिंग केलं कमी; जीडीपी ४ टक्क्यांनी घसरणार

मूडीजने भारताचं रेटिंग केलं कमी; जीडीपी ४ टक्क्यांनी घसरणार

Subscribe

सार्वभौम रेटिंगचा परिणाम देशाच्या गुंतवणूकीवर होणार आहे. २०२०-२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ४ टक्क्यांनी घसरू शकते असंही मूडीजने म्हटलं आहे.

भारताची ढासाळलेल्या अर्थव्यवस्थेवरुन रेटिंग एजन्सी मूडीजने भारताचे सार्वभौम रेटिंग कमी केलं आहे. यामुळे केंद्र सरकारचं संकट वाढलं आहे, कारण या रेटिंगचा परिणाम देशाच्या गुंतवणूकीवर होतो. एवढेच नव्हे तर या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२०-२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ४ टक्क्यांनी घसरू शकते असंही मूडीजने म्हटलं आहे.

आउटलुकला नकारात्मक ठेवत मूडीजने भारताचे सार्वभौम रेटिंग कमी केले आहे. यापूर्वी भारताचे रेटिंग ‘Baa2’ होतं, ते आता ‘Baa3’ करण्यात आलं आहे. भारतासमोर आर्थिक मंदीचा प्रचंड धोका आहे, ज्यामुळे आथिर्क लक्ष्यावर दबाव वाढत आहे, असं मूडीजने म्हटलं आहे.

- Advertisement -

सार्वभौम क्रेडिट रेटिंग म्हणजे काय?

आंतरराष्ट्रीय एजन्सी वेगवेगळ्या देशांच्या सरकारांच्या कर्जाची परतफेड करण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करतात. यासाठी आर्थिक, बाजारपेठ आणि राजकीय जोखीम या आधारावर रेटिंग काढलं जातं. देश वेळेत आपलं कर्ज फेडण्यास सक्षम असेल की नाही, हे या रेटिंगवरुन सूचित केलं जातं. या रेटिंग्समध्ये अव्वल गुंतवणूक ग्रेडपासून जंक ग्रेडपर्यंतचे रेटिंग्ज आहेत. जंक ग्रेड डीफॉल्ट श्रेणीमध्ये गणलं जातं.

रेटिंग कसं ठरवलं जातं?

एजन्सी सहसा आउटलुक रिविजनवर आधारित देशांची रेटिंग निश्चित करतात. भविष्यातील कारवाईच्या शक्यतेनुसार एजन्सी देशांच्या रेटिंगचे तीन प्रकारात विभाजन करतात. निगेटिव्ह, स्टेबल आणि पॉझिटिव्ह आउटलुक या श्रेणींध्ये विभाजन केलं जातं. ज्या देशाचा आउटलुक पॉझिटिव्ह आहे, त्याचे रेटिंग अपग्रेड होण्याची अधिक शक्यता असते.

- Advertisement -

हेही वाचा – रेल्वेत एकाही प्रवासी मजुराचा अन्न-पाण्यावाचून मृत्यू झालेला नाही; रेल्वेमंत्र्यांचा दावा


स्टँडर्ड अँड पूअर्स (एस अँड पी), फिच आणि मूडीज इन्व्हेस्टर्स जगभरातील सार्वभौम रेटिंग निश्चित करतात. मूडीज गुंतवणूक ग्रेड देशांना Baa3 किंवा उच्च रेटिंग देते. मूडीजने भारताचे परकीय चलन आणि स्थानिक चलनातील दीर्घकालीन समस्या ‘Baa2’ वरून ‘Baa3’ पर्यंत कमी केली आहे. अल्प मुदतीचे स्थानिक चलन रेटिंग P-2 वरून P-3 पर्यंत कमी केलं गेलं आहे. आउटलुक देखील निगेटिव्ह ठेवण्यात आला आहे.

जीडीपी ४ टक्क्यांनी कमी होणार

वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, चालू आर्थिक वर्षात भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) चार टक्क्यांपर्यंत घट होणार आहे, असा अंदाज मूडीजने वर्तवला आहे. भारताची चार दशकांपेक्षा जास्त काळातील ही पहिलीच वेळ असेल जेव्हा संपूर्ण वर्षांतील जीडीपी कमी होणार आहे. या अंदाजानुसार मूडीजने भारताचे सरकारी पत रेटिंग ‘Baa2′ वरून ”Baa3’ पर्यंत कमी केले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -