घरCORONA UPDATECovishield vs Covaxin: कोविशिल्ड लसीमध्ये सर्वाधिक अँटीबॉडी, भारतातील संशोधनातून बाब उघड

Covishield vs Covaxin: कोविशिल्ड लसीमध्ये सर्वाधिक अँटीबॉडी, भारतातील संशोधनातून बाब उघड

Subscribe

कोवॅक्सिनमध्ये ८० तर कोव्हिशील्डमध्ये ९८ टक्के अँटीबॉडीचे प्रमाण

देशात कोरोनाविरोधी लसीकरण आणि फंगस इंफेक्शन संदर्भात पहिल्यांदाच दोन वेगवेगळे अभ्यास करण्यात आले आहेत. यात लसीकरणासंदर्भात देशातील १२ राज्यांतील १९ रुग्णालयांमध्ये झालेल्या अभ्यासात असे दिसून आले की, कोवॅक्सिन लस घेणाऱ्यांपेक्षा कोव्हिशील्ड लस घेतलेल्या नागरिकांमध्ये अँटीबॉडीचे प्रमाण सर्वाधिक आहे.

कोवॅक्सिनमध्ये ८० तर कोव्हिशील्डमध्ये ९८ टक्के अँटीबॉडीचे प्रमाण

पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात आणि झारखंडमधील ६ रुग्णालये आणि स्वतंत्र आरोग्य तज्ज्ञांनी मिळून हा अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार, कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सिन दोन्ही लसी प्रभावी आहेत. परंतु कोवॅक्सिनपेक्षा कोव्हिशील्ड घेणाऱ्या नागरिकांमध्ये अँडीबॉडीचे प्रमाण जास्त होते.

- Advertisement -

या अभ्यासासाठी देशातील ५१५ आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. यातील ९० कर्मचाऱ्यांना कोवॅक्सिन लसीचे दोन डोस देण्यात आले, तर काहींना कोव्हिशील्ड लस देण्यात आली. या दोन्ही गटातील कर्मचाऱ्यांमध्ये लसीकरणानंतर अँटीबॉडी तयार झाली. परंतु कोव्हिशील्ड घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये अँटीबॉडीचे प्रमाण ९८ टक्के आणि कोवॅक्सिन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये अँटीबॉडीचे प्रमाण ८० टक्के होते. या अभ्यासातून लसींचे दोन्ही डोस घेणे महत्त्वाचे असल्याचेही अधोरेखित झाले. देशात लसीसंदर्भात अनेक संशोधने झालीत. परंतु देशातील हा पहिलाच अभ्यास आहे ज्यात कोवॅक्सिन आणि कोव्हिशील्ड लसींच्या निकालांची आपापसात तुलना केली गेली.

स्टेरॉइड्सह मधुमेहवरील औषधे न घेणाऱ्यांना ब्लक फंगसचा धोका

दरम्यान यात ब्लॅक फंगससंदर्भात झालेल्या अभ्यासात असे समोर आले की, स्टेरॉइड्सह मधुमेह आजारावरील औषधे न घेणाऱ्यांना याचा सर्वाधिक धोका आहे. तसेच देशातील २६ राज्यांमध्ये ब्लॅक फंगसची प्रकरणे पसरली असून गेल्यावर्षीपासूनच कोरोनानंतर ब्लॅक फंगस आजार पसरत असल्याचे समोर आले आहे. यात २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये फंगस इंफेक्शनचे प्रमाण वाढत गेले. परंतु यादरम्यान राज्य आणि केंद्र सरकारने याप्रकरणांकडे लक्ष दिले नाही. हे दुर्लक्ष झाले नसते तर देशात फंगस इंफेक्शनमुळए होणारे मृत्यू रोखता आले असते.

- Advertisement -

त्याचवेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (सीडीसी)यावर अभ्यास केला होता. त्यामुळे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच फंगस इंफेक्शन काही प्रकरणे चर्चेत आली परंतु यावर फारशी चर्चा झालेली नाही.


Monsoon 2021 : महाराष्ट्रात मान्सून सक्रिय, येत्या आठवड्याभरात मुंबईत पोहचण्याची शक्यता- हवामान विभाग

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -