घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCorona: अमेरिकेपेक्षा ब्राझीलमध्ये कोरोनाबाधित आणि मृतांच्या संख्येत सर्वाधिक वाढ!

Corona: अमेरिकेपेक्षा ब्राझीलमध्ये कोरोनाबाधित आणि मृतांच्या संख्येत सर्वाधिक वाढ!

Subscribe

जगात कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे. कोरोनामुळे जगभरात ४ लाख ८४ हजारांहून अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत.

जगात २१३ देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. वर्ल्डोमीटरच्या माहितीनुसार, जगात आतापर्यंत ९५ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर मृतांचा आकडा ४ लाख ८४ हजारावर पोहोचला आहे. तसेच ५१ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगातील जवळपास ६६ टक्के कोरोनाची प्रकरणे फक्त १० देशांमध्ये आहे.

जगात अमेरिका देश सर्वाधिक कोरोना प्रभावित आहे. आतापर्यंत अमेरिकेत २४ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १ लाख २४ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. पण अमेरिकेपेक्षा ब्राझीलमध्ये दररोज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची आणि मृतांची नोंद होत आहे. अमेरिकेत २४ तासांत ३९ हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८०६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ब्राझीलमध्ये ४० हजार ९९५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १ हजार १०३ जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझील नंतर रशिया आणि भारत या देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची आकडा झपाट्याने वाढत आहे.

- Advertisement -

जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित १० देश

अमेरिका : कोरोनाबाधित – २,४६३,२७१ – मृत्यू – १२४,२८१
ब्राझील : कोरोनाबाधित – १,१९२,४७४ – मृत्यू – ५३,८७४
रशिया : कोरोनाबाधित – ६०६,८८१ – मृत्यू – ८,५१३
भारत : कोरोनाबाधित – ४७२,९८५ – मृत्यू – १४,९०७
ब्रिटन : कोरोनाबाधित – ३०६,८६२ – मृत्यू – ४३,०८१
स्पेन : कोरोनाबाधित – २९४,१६६ – मृत्यू – २८,३२७
पेरू : कोरोनाबाधित – २६४,६८९ – मृत्यू – ८,५८६
चिली : कोरोनाबाधित – २५४,४१६ – मृत्यू – ४,७३१
इटली : कोरोनाबाधित- २३९,४१० – मृत्यू – ३४,६४४
इराण : कोरोनाबाधित – २१२,५०१ – मृत्यू – ९,९९६


हेही वाचा – घ्या, हेच बाकी होतं आता! इम्युनिटी वाढवणारं Ice Cream बाजारात दाखल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -