घरदेश-विदेशCorona Vaccination: देशातील अनेक राज्यात लाखो कोरोना लस धूळखात पडून

Corona Vaccination: देशातील अनेक राज्यात लाखो कोरोना लस धूळखात पडून

Subscribe

देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यातच कोरोना लस वापराविना पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यावर आता राजकीय नेत्यांनीही टीका करण्यास सुरु केली आहे. केंद्राने महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा वाढवून द्यावा अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. यावर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्राला केंद्राने पुरवलेल्या ५४ लाख लसींच्या साठ्यांपैकी १२ मार्चपर्यंत फक्त २३ लाख लसींचा वापर झाला आहे, त्यामुळे ५६ टक्के लसीचा साठा पडून राहिला असल्याचा दावा केला आहे. यावर उत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत म्हणाले की आधी देशातील लोकांचे लसीकरण करावे आणि मग केंद्र सरकारने इतर देशांना मदत करावी असे म्हंटले आहे. त्यामुळे या लसीच्या साठ्याचे नेमके काय होतेयं आणि खरोखरचं या लसीचे ठोस वाया जातायतं का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संदर्भातील माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या या माहितीनुसार, देशात कोरोना लसीचे ठोस वाया जाण्याचे प्रमाण ६.५ टक्क्यांवर पोहचली आहे. तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधिक लसीचे ठोस वाया जात असल्याची माहिती समोर आली आहे.

‘लस वाया जाणे ही गंभीर बाब’ 

देशात रुग्ण संख्या वाढत असतानाही अनेक राज्यात वापराविना पडून असणाऱ्या लसीकरण साठ्यावर पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली. याविषयी बोलताना पंतप्रधानांनी  टियर-2 आणि टियर-3 शहरांत देखील कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. याआधी या शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव जास्त झाला नव्हता. मात्र जर कोरोना ग्रामीण भागात पसरला तर त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होऊन बसेल. छोट्या शहरांमध्ये कोरोना चाचण्या वाढवाव्या लागतील.

- Advertisement -

मात्र महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ आदी राज्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचं आहे. अनेक राज्यांमध्ये लसी वापराविना पडून आहेत, याबाबत नरेंद्र मोदींनीही चिंता व्यक्त केली. कोरोना लस वाया जाण्याची समस्या गंभीर आहे. ती सुधारायला हवी. तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये कोरोना लस वाया जाण्याचं प्रमाण ९ ते १८ टक्के आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये हे प्रमाण जवळपास तेवढंच आहे, असं मोदींनी म्हटलं.

लस वाया जाणे किंवा खराब होण्याची नेमकी कारणे

कोरोना लस खराब होण्याची मुख्य कारण म्हणजे बाटली हरवली आणि खूप दिवसांने भेटली, किंवा लसीची बॉटल फुटल्याने लस खराब होते. लस वाऱ्याच्या बराच काळ संपर्कात आल्याने ती वापर करणे पण धोकादायक ठरते. त्यामुळे या लसीच्या बाटल्या फेकून देण्याशिवाय पर्याय राहत नाही. यामध्ये अनेकाद लसीकरण केंद्रांवरील नियोजनाचा अभाव दिसतो.

- Advertisement -

तसेच एखादी लशीची बाटली उघडल्यानंतर, ठाराविका काळात त्यातला लसीचा डोस १० जणांना द्यावा लागतो, मात्र लसीकरणा केंद्रावर त्या ठरावीक काळात नागरिक नसतील तर ती लस वाया जाते. त्यामुळे या लसीही टाकून द्याव्या लागतात.

मनीकंट्रोलला आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्डपेक्षा (Covisheild) भारत बायोटेकची कोवॅक्सीन (Covaxin) वाया गेल्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. कारण कोवॅक्सीनची लसीची बाटली उघडली  की, ठरावीक वेळात त्यातून २० जणांना डोस द्यावे लागतात. मात्र तेवढे लोक लस घ्यायला आलेच नाही, तर ती लस वाया जाते. याशिवाय केंद्रावरील तापमानाचाही एक मुद्दा समोर येत आहे. कारण या लसीचा साठा ठराविक तापमानातच ठेवावा लागतो. त्यामुळे केंद्रावरील अतिउष्ण किंवा अति थंड तापमानामुळे कोरोना लस वाया जाऊ शकते. यामुळे देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने कोरोना लसीकरणाचा वेगही वाढवणे गरजेचे आहे. मात्र यात लसीचे साठे जर असा वापरा विना पडून खराब होत असतील तर ही गंभीर बाब आहे.

मोदींच्या भाषणानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील लसीकरणा मोहिमेवर स्पष्टीकरण दिले की, आपण 3 लाख लस देण्याच्या गतीने काम सुरू केले आहे. त्यासाठी लशीचा पुरवठा मिळणे गरजेच आहे. त्यामुळे 20 लाखांची लशी राज्याला मिळाव्यात अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्री आणि राजेश भूषण यांना केली आहे. पण, केंद्रीय मंत्र्यांकडून आपल्यावर टीका करण्यात आली आहे की लशीचा साठा उरलेला आहे. पण जर 3 लाख लशी देण्याचे नियोजन केले आहे तर फक्त 10 दिवसांचा लशीचा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे’ त्यामुळे आता कोरोना लसीकरणावरही राजकारणांचे वाद प्रतिवाद सुरु झाला आहे.


 

 

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -