घरताज्या घडामोडीलॉकडाऊनचा कबुतरांना फटका; मस्जिद मधील १ हजार कबुतरांचा मृत्यू

लॉकडाऊनचा कबुतरांना फटका; मस्जिद मधील १ हजार कबुतरांचा मृत्यू

Subscribe

लॉकडाऊनमुळे तब्बल १ हजार पाळीव कबुतरांचा मृत्यू झाला आहे.

वुहान शहरातून जगभर पसरणाऱ्या कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला आहे. अनेक देशांना या कोरोनाचा फटका बसला असून अनेकांचा या विषाणूने मृत्यू झाला आहे. मात्र, या विषाणूचा माणसांवरच परिणाम झाला नसून याचा फटका मुक्या प्राण्यांना आणि पक्षांना देखील बसला आहे. या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आले असून या लॉकडाऊनमुळे तब्बल १ हजार कबुतरांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अफगाणिस्तानमध्ये घडली आहे.

नेमके काय घडले?

अफगाणिस्तानच्या प्रसिद्ध अशा मजार ए शरीफ मस्जिदमध्ये तब्बल १ हजार कबुतरांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आले होते. या दरम्यान, मस्जिद देखील बंद होती. त्यामुळे कबुतरांना दाणे घालणारे कोणी नसल्याने या पाळीव कबुतरांचा भूकेने मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

चॅनल न्यूज आशियातील एका अहवालानुसार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आले होते. त्यामुळे अनेक दिवसांपासून मस्जिद देखील बंद करण्यात आली होती. त्याचप्रमाणे मस्जिद उघडण्याची परवानगी न मिळाल्याने मस्जिदमधील पाळीव कबुतरांचा भुकेने तडफडून मृत्यू झाला आहे. दर दिवसाला ३० कबूतर आपले प्राण सोडत होते.

निळी मस्जिद

१२ वी शताब्दी येथे असलेली ही प्रसिद्ध मस्जिद निळी मस्जिद म्हणून देखील ओळखली जाते. कारण या मस्जिदमध्ये निळ्या रंगाच्या दगडांचा समावेश आहे.

- Advertisement -

२३ हजार लोकांना कोरोनाची लागण

अफगाणिस्तानमध्ये २३ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १ हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या देशाची लोकसंख्या ९० लाख आहे. मात्र, या देशात केवळ ४०० व्हेंटिलेटरच उपलब्ध आहेत.


हेही वाचा – कोरोना रुग्णसंख्येत मुंबईने चीनच्या वुहान शहराला मागे टाकलं


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -