घरCORONA UPDATE२४ तासांमध्ये १२ लाखांपेक्षा जास्त कोविडच्या चाचण्या; भारताचा नवा विक्रम

२४ तासांमध्ये १२ लाखांपेक्षा जास्त कोविडच्या चाचण्या; भारताचा नवा विक्रम

Subscribe

देशामध्ये आतापर्यंत ६ कोटी ३६ लाख ६१ हजार ६० जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

कोरोना रुग्ण बरे होण्यामध्ये अमेरिकेला मागे टाकत भारताने अव्वल स्थान मिळवले. त्यापाठोपाठ आता २४ तासांमध्ये तब्बल १२ लाख ६ हजार ८०६ चाचण्या करत भारताने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कोविड १९ विरोधातील लढ्यामध्ये भारताने एक महत्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. देशामध्ये आतापर्यंत ६ कोटी ३६ लाख ६१ हजार ६० जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशामध्ये कोविड-१९ च्या चाचण्या करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये अतिशय वेगाने वाढ होत आहे. देशाची दरदिवसाला चाचणी करण्याची क्षमता अनेक पटींनी वाढली आहे. ८ एप्रिलला देशात अवघ्या १० हजार चाचण्या होत होत्या. आत तीच संख्या सरासरी १२ लाखांच्या पुढे गेली आहे. वाढत्या चाचण्यांच्या संख्येमुळे केवळ ९ दिवसांत एक कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. मोठ्या संख्येने चाचण्या होत असल्यामुळे कोविडची बाधा झालेल्या रूग्णांची ओळख लवकर होते. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करणे शक्य होत आहे. वेळेवर आणि प्रभावी उपचारांमुळे रूग्णांच्या मृत्यूदराचे प्रमाणही कमी होत आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यामुळे संक्रमणाचे प्रमाण कमी होत असून, दैनंदिन कोविडबाधित होण्याच्या दरामध्येही घट होत आहे.

- Advertisement -

‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार चाचणीचे निकष पूर्ण करणार्‍या कोणत्याही व्यक्तीला आणि खासगी वैद्यकीय व्यावसायिकाला तसेच सर्व पात्र वैद्यकीय चिकित्सकांना कोविड-१९ चाचणी लिहून देता येऊ शकते. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अवलंबिलेल्या नीतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने चाचण्या करणे हा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे कोणीही व्यक्ती चाचणी करण्यातून सुटू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ‘रॅपिड अँटिजन टेस्ट’ केल्यानंतर आलेला निष्कर्ष आरटी-पीसीआर नियमनाच्या अधिन राहून देण्यात आलेला आहे.

- Advertisement -

सुलभ चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विस्तारित चाचणी प्रयोगशाळांचे जाळे देशभरामध्ये तयार करण्यात आले आहे. देशामध्ये १७७३ प्रयोगशाळांमधून मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार भारतामध्ये सध्या प्रति दशलक्ष १४० चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे आतापर्यंत देशात प्रति दशलक्ष चाचण्यांमध्ये ४६ हजार १३१पर्यंत वाढ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -