घरदेश-विदेशApple आणि Google App स्टोअरमधून 15 लाखाहून अधिक Apps काढून टाकणार? प्रकरण...

Apple आणि Google App स्टोअरमधून 15 लाखाहून अधिक Apps काढून टाकणार? प्रकरण नेमकं काय?

Subscribe

Apple आणि Google ने या वर्षाच्या सुरुवातीलाच डेव्हलपर्सना अॅप्सबद्दल इशारा दिला की, बऱ्याच काळापासून ज्यांनी आपल्या अॅप्समध्ये अपडेट केले गेले नाहीत. त्यांचे अॅप्स प्लेटस्टोरमधून हटवले जातील. दरम्यान काही रिपोर्टनुसार, Apple ने काही अॅप्स डेव्हलपर्सला नोटीस पाठवत इशारा दिला की, ज्यांनी आपले अॅप निर्धारित वेळेत अपडेट केल नाही ते अॅप्स प्ले स्टोरमधून काढून टाकले जातील. याशिवाय आता analytics फर्म Pixalate च्या अहवालातही App Store आणि Play Store वरील सुमारे 30 टक्के अॅप्स काढून टाकण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

एका अहवालानुसार, Google Play Store आणि Apple App Store वरील 1.5 मिलियन अॅप्समध्ये वर्षानुवर्षे कोणतेही अपडेट केलेले नाहीत. Education, Reference आणि Game या विभागांना या लिस्टमधून वगळण्यात आले आहेत. यातील अनेक अॅप्स हे लहान मुलांमध्ये लोकप्रिय आहेत.

- Advertisement -

Pixalate च्या अहवालानुसार, 314,000 पेक्षा जास्त अॅप्स जे पाच वर्षांहून अधिक काळ अपडेट केलेले नाहीत. यापैकी, 58 टक्के Apple अॅप स्टोअर (184k अॅप्स) आणि 42 टक्के Google Play Store (130k अॅप्स) वर आहेत.

दरम्यान अनेक डेव्हलपर्सनी Apple आणि Google च्या इशाऱ्याकडे लक्ष दिले आहे. कारण अहवालात असे म्हटले आहे की, 2022 च्या पहिल्या तिमाहीच्या अखेरीस, गेल्या सहा महिन्यांत Google आणि Apple अॅप स्टोअरमध्ये 1.3 मिलियन अॅप्स अपडेट केले गेले आहेत.

- Advertisement -

यावर Apple ने सांगितले की, जे अॅप स्टोअरमधून काढून टाकेल, परंतु अजूनही युजर्सच्या मोबाईल किंवा इतर डिव्हाईसमध्ये ते अॅप डाउनलोड केलेले असतील त्यावर परिणाम होणार नाही, त्यामुळे युजर्स असे अॅप आपल्या डिव्हाइसवर वापरू शकतात.

Apple ने आपल्या इंप्रूव्हमेंट पेजवर सांगितले आहे की, आम्ही अॅप्सचे मूल्यमापन करण्याची एक प्रक्रिया लागू करत आहोत. त्यामुळे कालबाह्य अॅप्सना काढून टाकण्याची प्रक्रिया राबवत आहे. Google ने गेल्या महिन्यात असेच काही अॅप्स हटवले होते आणि सांगतिले की Play Store च्या टारगेट लेव्हल API आवश्यकतांचा विस्तार करत आहे.


नवाबांची नगरी ‘लखनऊ’ शहराच्या नावात होणार बदल? सीएम योगींच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -