घरताज्या घडामोडीहज यात्रेसाठी २५ दिवसांत २० हजारहून अधिक नागरिकांचे अर्ज, अल्पसंख्यांक मंत्रालयाची माहिती

हज यात्रेसाठी २५ दिवसांत २० हजारहून अधिक नागरिकांचे अर्ज, अल्पसंख्यांक मंत्रालयाची माहिती

Subscribe

हज यात्रेसाठी एकूण २० हजारहून अधिक नागरिकांनी अर्ज केले असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाने दिली आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हज यात्रेसाठी जाणाऱ्या नागरिकांना ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करुन दिले होते. या पोर्टलवर हज यात्रेसाठी जाणाऱ्या नागरिकांना अर्ज करण्यास सांगितले होते. १ नोव्हेंबरपासून अर्ज करण्याची प्रकिया सुरु करण्यात आली होती. यानुसार अवघ्या २५ दिवसांत २० हजारहून अधिक नागरिकांनी अर्ज केला असल्याचे केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून यात्रेकरुंसाठी पारदर्श आणि परवडणारी यात्रा सुनिश्चित केली आहे.

केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार नक्वी यांनी मुंबईतील हज हाऊस येथे हज २०२२ च्या तयारीसंदर्भात भारतीय हज समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत हज यात्रेची प्रक्रिया १०० टक्के डिजिटल/ऑनलाइन असेल असेही त्यांन म्हटलं आहे. हज अनुदान रद्द करणे, मुस्लिम महिलांना “मेहरम” (पुरुष साथीदार) शिवाय हजला जाण्यावरील निर्बंध उठवणे, १०० टक्के डिजिटल/ऑनलाइन हज प्रक्रिया यासारख्या प्रभावी आणि दूरदर्शी सुधारणांनी भारतीय मुस्लिमांसाठी “हज यात्रा सुलभ करणे ” हे सुनिश्चित करण्यात आले आहे.

- Advertisement -

१ नोव्हेंबरपासून हज साठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हज २०२२ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२२ आहे. नागरिक हजसाठी ऑनलाइन आणि “हज मोबाईल अॅप” द्वारे अर्ज करत आहेत. हे अॅप “हज अॅप इन युवर हँड” या घोषवाक्यासह अद्ययावत करण्यात आले आहे.अॅपमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये असून वारंवार विचारले जाणारे प्रश्न, अर्ज भरण्यासाठी माहिती, अर्जदारांना अर्ज भरण्यासाठी अत्यंत सोप्या पद्धतीने माहिती देणाऱ्या चित्रफितीं यात समाविष्ट आहेत

आतापर्यंत २०,०००हून अधिक लोकांनी हज २०२२ यात्रेसाठी अर्ज केला असून त्यामध्ये “मेहरम” श्रेणीशिवाय हज यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या ९० महिलांचा समावेश आहे.याआधी २०२० आणि २०२१ या वर्षींच्या हज यात्रेसाठी ३००० हून अधिक महिलांनी “मेहरम” म्हणजे पुरुष सहकाऱ्याविना या श्रेणीअंतर्गत अर्ज केले होते.जर त्या महिलांना २०२२ साली देखील यात्रा करायची असेल तर त्यासाठी त्यांचे आधीचे अर्ज पात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय इतर महिला देखील “मेहरम” श्रेणीशिवाय हज यात्रेला जाण्यासाठी अर्ज करू शकतात. “मेहरम” श्रेणीशिवाय यात्रा करू इच्छिणाऱ्या सर्व महिलांना लॉटरी पद्धतीतून सूट देण्यात आली आहे.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नक्वी म्हणाले की हज २०२२ च्या यात्रेकरूंना यात्रा प्रवेश करण्यासाठी पूर्वीच्या २१ ऐवजी आता १० प्रवासी बिंदू व्यवस्था करण्यात आली आहे. अहमदाबाद, बेंगळूरु, कोचीन,दिल्ली,गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता,लखनौ, मुंबई आणि श्रीनगर या १० शहरांतून हज २०२२ यात्रा प्रवास सुरु होईल.

भारतीय हज समितीचे पोर्टल; हज समूह आयोजकांसाठी पोर्टल ज्यात समूह आयोजक आणि त्यांचे पॅकेज इत्यादी सर्व तपशील असतील; डिजिटल आरोग्य ओळखपत्र;”ई-मसिहा” आरोग्य सुविधा; मक्का-मदीनामधील निवास/वाहतुकीसंबंधी सर्व माहिती प्रदान करणारे “ई-सामान प्री-टॅगिंग” आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज “हज मोबाईल ॲप” ने भारतीय यात्रेकरूंसाठी पारदर्शक, परवडणारी आणि आरामदायी हज यात्रा सुनिश्चित केली आहे, असे मंत्री म्हणाले

हज 2022 दरम्यान कोरोना प्रतिबंधासाठी नियम लक्षात घेऊन, हज यात्रेकरूंची निवड प्रक्रिया ही दोन मात्रा घेऊन पूर्ण झालेले कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि भारत आणि सौदी अरेबिया सरकारने ठरवले निकष आणि मार्गदर्शक तत्वांच्या अनुसार केली जाईल.


हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांनी तुटेपर्यंत ताणू नये अन्यथा कारवाई करु, अनिल परबांचा इशारा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -