Coronavirus in China: चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्येने तोडला रेकॉर्ड; भारताने शांघाईमध्ये बंद केली कॉन्सुलर सेवा

शांघाईमध्ये कडक लॉकडाऊन असल्यामुळे तेथील परिस्थिती खूप बिकट झाली आहे. त्यामुळे भारतीय दुतासाने कॉन्सुलर सेवा शांघाईमध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Coronavirus

चीनमध्ये कोरोनाची लाट नियंत्रणात येत नाहीये. कठोर निर्बंध लावूनही चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्या रेकॉर्ड तोडत आहेत. गेल्या २४ तासांत चीनमध्ये २६ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याच्या अदल्या दिवशी १२ एप्रिलला लक्षणे नसलेले २५ हजार १४१ नवे कोरोनाबाधित आढळले होते. तर लक्षणे असणारे १ हजार १८९ रुग्णांची नोंद झाली होती. तसेच ११ एप्रिलला २२ हजार ३४८ लक्षणे नसलेले रुग्ण आढळले होते. यादरम्यान चीनच्या शांघाई शहरामध्ये कडक लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे भारताने शांघाईमधील कॉन्सुलर सेवा बंदी केली आहे.

चीनच्या झिरो कोविड धोरणावर टीका

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान चीनच्या झिरो कोविड धोरणावर टीका होत आहे. यावर मंगळवारी पत्रकारांना संबोधित करताना चीनचे परराष्ट्र मंत्र्यांचे प्रवक्ते म्हणाले की, चीनचे झिरो कोविड धोरण हे महामारी विरोधी प्रोटोकॉल विज्ञान आणि तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. तसेच कोविडसंदर्भात बनवलेले धोरण हे जागतिक आरोग्य संघटनेच्या सिद्धांतावर आधारित असते.

भारतीय दूतावासाने शांघाईमध्ये बंद केली कॉन्सुलर सेवा

शांघाईमध्ये कडक लॉकडाऊन असल्यामुळे तेथील परिस्थिती खूप बिकट झाली आहे. यादरम्यान भारतीय दूतावासाने सांगितले की, शांघाईमध्ये लॉकडाऊनमुळे भारताचे कॉन्सुलेट जनरलशी संपर्क होऊ शकत नाहीये. कॉन्सुलेट जनरल शांघाईमध्ये व्यक्तिगत रुपात कॉन्सुलर सेवा देण्याच्या परिस्थितीत नाहीयेत. त्यामुळे दूतावासाने भारतीयांसाठी गाईडलाईन जारी केली आहे.

अमेरिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावले

यापूर्वी अमेरिकेने शांघाईमध्ये आपल्या अत्यावश्यक नसलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना शहर सोडण्याचे आदेश दिले होते. याबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने निर्देश दिले होते. परराष्ट्र मंत्रालयानुसार, यादरम्यान अमेरिकेचे आधिकारी वाणिज्य दूतावासात कामावर तैनात राहतील.


हेही वाचा – दुसरा डोस आणि booster dose मधील अंतर 6 महिने करावे; अदर पूनावालांचे केंद्राला आवाहन