Corona: जगात कोरोनाचे थैमान! ३० लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण, मृतांचा आकडा २ लाख पार!

कोरोनामुळे जगभरातील मृतांचा आकडा २ लाखांहून अधिक झाला आहे. जगात सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत.

new coronavirusstrain detects in malaysia it is ten times more infectious
कोरोना विषाणू

जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. जगभरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३० लाखांहून अधिक झाली आहे. तर २ लाख ११ हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात सामर्थ्यवान देश असलेल्या अमेरिकेत कोरोनाने थैमान घातल आहे. अमेरिकेत १० लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५६ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील ncov2019.live या अधिकृत वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, जगभरात आतापर्यंत कोरोनामुळे २ लाख ११ हजार ५९७ रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. ५६ हजार ७९७ कोरोना रुग्ण अमेरिकेत मरण पावले आहेत. अमेरिके पाठोपाठ इटलीमध्ये देखील मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. इटलीत कोरोनामुळे २६ हजार ९७७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये २३ हजार ५२१, फ्रान्स २३ हजार २९३ आणि ब्रिटनमध्ये २१ हजार ०९२ लोक मृत्यूमुखी पडले आहेत.

जॉन्स हॉपकिन्स विद्यापिठाच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा सर्वात जास्त परिणाम अमेरिकेवर झाला आहे. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनाचे १० लाख १० हजार ३५६ रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. न्यूयॉर्कमध्ये २ लाख ९८ हजार ४ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी २२ हजार ६२३ जणांचा मृत्यू झाला आहे.

विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉकडाऊन जाहीर केला नसून लोकांना घरी राहण्याचे आदेश दिले आहे. परंतु असे असूनही अनेक शहरांमध्ये लोक उद्यानात आणि रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे अमेरिकेची परिस्थितीत दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत १ हजार ३०३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.


हेही वाचा – Corona Lockdown Effect: ६ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी पीएफमधून काढले पैसे!