Coronavirus: जगात ४ लाखांहून अधिक बळी; कोरोनाबाधितांची आकडा ७० लाखांवर!

जगभरातील कोरोनाबाधितांच्या यादी भारत आता पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

US Corona Update

जगातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. जगभरात कोरोना विषाणूमुळे ४ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ७० लाखांहून अधिक जण कोरोना बाधित झाले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस चिंता वाढताना दिसत आहे. सर्वाधिक कोरोनाचा फटका अमेरिकेला बसला असून अमेरिकेत १ लाख १२ हजारांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या पाठोपाठ सर्वाधिक कोरोनाचे सर्वाधिक बळी ब्रिटन, ब्राझील, इटली, फ्रान्स आणि स्पेन या देशात पडले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील ncov2019.live या अधिकृत वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे ४ लाख २ हजार ६७८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ७० लाख ५ हजार ८२२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शिवाय दिलास देणारी बाब म्हणजे ३२ लाख २१ हजार २६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच भारत आता या कोरोनाबाधितांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, इटली, स्पेन या देशांच्या तुलनेत भारतातील कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे.

जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त १० देश

अमेरिका : कोरोनाबाधित – १,९८८,७०० – मृत्यू – ११२,१०१
ब्राझील : कोरोनाबाधित – ६७६,४९४ – मृत्यू – ३६,०४४
रशिया : कोरोनाबाधित – ४६७,६७३ – मृत्यू – ५,८५९
ब्रिटन : कोरोनाबाधित – २८४,८६८ – मृत्यू – ४०,४६५
भारत : कोरोनाबाधित – २४७,८५७ – मृत्यू – ६,९५४ 
स्पेन : कोरोनाबाधित – २४१,३१० – मृत्यू – २७,१३५
इटली : कोरोनाबाधित- २३४,८०१ – मृत्यू – ३३,८४६
पेरू : कोरोनाबाधित – १९१,७५८ – मृत्यू – ५,३०१
फ्रान्स : कोरोनाबाधित – १८७, ०६७ – मृत्यू – २९,१४२
जर्मनी : कोरोनाबाधित- १८५,६९६ – मृत्यू – ८,७६९


हेही वाचा – मजुरांना परत आणण्यासाठी कंपन्या देतेय फ्लाइटची तिकीट आणि जास्त पगार