पाकिस्तानच्या संपर्कात PFIच्या सदस्यांचा समावेश, फोनमध्ये सापडले 50 हून अधिक पाकिस्तानी नंबर

pfi

मध्य प्रदेशात पोलिसांनी पीएफआयवर कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. आता पीएफआयचे कनेक्शन पाकिस्तानमध्येही सापडले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मोबाईलमध्ये 50 हून अधिक पाकिस्तानी नंबर सापडले आहेत. अनेकवेळा आरोपी पाकिस्तानातही गेले आहेत. त्यामुळे पोलीस आता टेरर फंडिंगचे पुरावे गोळा करत आहेत.

पीएफआयचे अब्दुल करीम (राज्य अध्यक्ष), मोहम्मद जावेद (राज्य कोषाध्यक्ष), जमील शेख (राज्य सचिव) आणि अब्दुल खालिद (महासचिव) यांना अटक करण्यात आली आहे. एटीएस सर्व आरोपींची चौकशी करत आहे. न्यायालयाने आरोपींना 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे तपासली असता त्यांचे पाकिस्तान कनेक्शन समोर आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अब्दुल खालिदच्या मोबाईलमधून अनेक गुपितं उघड झाली आहेत. खालिदच्या मोबाईलमध्ये 50 हून अधिक पाकिस्तानी नंबर सापडले आहेत. त्याचा भाऊ मोहम्मद महमूदही 6 वेळा पाकिस्तानला गेला आहे. तपास यंत्रणा मोहम्मद मेहमूदचा शोध घेत आहे.

एटीएसने मध्य प्रदेशातील 8 जिल्ह्यातून PFIच्या 21 जणांना अटक केली आहे. त्यापैकी इंदूर, उज्जैन आणि नीमच येथून 4-4, राजगड येथून 3, शाजापूर आणि श्योपूर येथून 2-2, गुना आणि भोपाळ येथून 1-1 जणांना ताब्यात घेण्यात आले. एटीएसने राजगड जिल्ह्यातील तालेन भागातील सखा तुर्कीपुरा येथे छापा टाकला. येथून सहजाद बेग, अब्दुल रहमान आणि हाफिज नावाच्या तिघांना एटीएसने ताब्यात घेतले.


हेही वाचा : ग्राहकांना न सांगताच पैसे कट केल्याने RBI ने ‘या’ बँकांना ठोठावला दंड