Monday, June 21, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश CoronaVirus 2nd wave: कोरोनाने ६०० हून अधिक डॉक्टरांचा बळी; दिल्ली, बिहारमध्ये सर्वाधिक...

CoronaVirus 2nd wave: कोरोनाने ६०० हून अधिक डॉक्टरांचा बळी; दिल्ली, बिहारमध्ये सर्वाधिक मृत्यू

Related Story

- Advertisement -

कोरोना विषाणूच्या कहरमुळे बर्‍याच लोकांचा जीव गेला आहे. कोविड -१९ विरुद्ध लढ्यात कोरोना योद्ध्याप्रमाणे लढा देत असणार्‍या अनेक डॉक्टरांनाही कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटे तब्बल ६०० हून अधिक डॉक्टरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या सुरू असलेल्या दुसर्‍या लाटेत कोविड -१९ मुळे एकूण ६४६ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत सर्वाधिक १०९ मृत्यू झाले असून यानंतर बिहारनंमध्ये ९७, उत्तर प्रदेशमध्ये ७९, राजस्थानमध्ये ४३, झारखंडमध्ये ३९, गुजरातमध्ये ३७, आंध्र प्रदेशात ३५, तेलंगणात ३४ आणि पश्चिम बंगालमध्ये ३० डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोविड -१९ रजिस्ट्रीमध्ये आयएमएचा डेटा ५ जूनपर्यंत जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेमध्ये ७४८ डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात महामारीच्या दुसऱ्या लाटेत २३ डॉक्टरांचा कोरोनाच्या संसर्गाचा बळी गेला. कोविड -१९ च्या दुसर्‍या लाटेत एकूण ६४६ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक १०९ मृत्यू दिल्लीत तर बिहारमध्ये ९७ डॉक्टरांचा मृत्यू झाला, असे इंडियन मेडिकल असोसिएशनने सांगितले.

भारतात कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने देशाची चिंता वाढली होती. परंतू दररोजच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसत असले तरी मृत्यूची संख्या जास्त आहे. भारतात कोरोनाचे १,२०,५२९ नवीन रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासात ३ हजार ३८० जणांचा कोरोनाने बळी गेला असून कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून ३ लाख ४४ हजारांवर पोहोचली आहे. तर सक्रिय रूग्णांची संख्या कमी झाली असून सध्या १५ लाख ५५ हजार २४८ इतकी झाली आहे. यासह देशात कोरोनाच्या रिकव्हरी दरात सुधारणा झाली आहे. त्यामुळे हा दर आता ९३. ०८ टक्के इतका झाला आहे.


- Advertisement -