घरताज्या घडामोडीUkraine-Russia War: रशियाच्या निशाण्यावर असलेल्या युक्रेनच्या सूमी युनिव्हर्सिटीमध्ये 750हून अधिक भारतीय विद्यार्थी...

Ukraine-Russia War: रशियाच्या निशाण्यावर असलेल्या युक्रेनच्या सूमी युनिव्हर्सिटीमध्ये 750हून अधिक भारतीय विद्यार्थी अडकले

Subscribe

22 फेब्रुवारीपर्यंत 15 हजार 900हून अधिक युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय मायदेशी परतले.

रशिया सध्या युक्रेनच्या सूमी शहरावर हल्ला करत आहे. एएफपी या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, रशियाने सूमी शहरावर हल्ला केला होता. यामध्ये 9 जणांसह 2 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान युक्रेनच्या सूमी स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये 750हून अधिक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. या भारतीय विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटी कँपसमधून भारतीय दूतावासाच्या बसेस घेण्यासाठी सकाळी 5 वाजता पोहोचल्या आहेत. विद्यार्थ्यांना पोल्टावाहून सुरक्षित बाहेर काढले जात आहे. शिवाय दूतावासच्या निर्देशानुसार, विद्यार्थ्यांना व्हिडिओग्राफी करण्याची परवानगी दिली नाहीये.

भारतीय विद्यार्थ्यांनी व्हिडिओ संदेश देऊन पहिल्यांदा म्हटले होते की, बॉम्बहल्ले होत असताना चालत सीमेपर्यंत पोहोचणे धोक्याचे काम आहे. त्यामुळे परिस्थिती थोडी व्यवस्थित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सूमीतून बाहेर काढले जाईल. माहितीनुसार, सूमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन काही वेळात बसेस रवाना होतील. अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना रोमानिया बॉर्डर मार्गे सुरक्षित बाहेर काढले जाईल आणि उद्या ऑपरेशन गंगाच्या विमानातून भारतीय विद्यार्थी मायदेशी परतील.

- Advertisement -

१५ हजारांहून अधिक भारतीय मायदेशी परतले

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी सरकारची ऑपरेशन गंगा मोहीम सुरू आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनच्या शेजारी देशांतून 11 विशेष उड्डाणाद्वारे रविवारी 2 हजार 135 भारतीयांना मायदेशी आणले आहे. माहितीनुसार, 22 फेब्रुवारीपर्यंत 15 हजार 900हून अधिक भारतीय परतले आहेत.


हेही वाचा – Ukraine Russia War: रशियाचा युक्रेनच्या सूमी शहरावर मोठा एअरस्ट्राईक; 9 जणांसह 2 मुलांचा मृत्यू


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -